

प्रिय...
प्रॉमिस डे तुला वचन देतो खऱ्या प्रेमाचं. वचन तुला चंद्र, सूर्य, नभातल्या ताऱ्यांचं. जो पर्यंत असेल चंद्र तारे, तोपर्यंत मी असेन तुझ्या सोबतीला.
हातामध्ये हात तुझा,
असावा कायम सोबती,
सुख-दुःखाच्या वाटेवर,
तुझीच राहो सांगाती.
राणी मी तुला कसं सांगू की तुझ्यावर किती मरतो. तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अनेकवेळा मी माझ्या मनातील भावना तुला वेळोवेळी सांगितल्या आहेत. पण तू असं माझ्यावर रूसायचं नाही. तू बोलत नाहीस ना तर माझं कामात मन लागत नाही. कॉलेजलाही जाऊ वाटत नाही. तू असलीस ना सोबतीला जगातील सर्व दु:ख दूर होतात. खूप भारी वाटतं तू सोबत असल्यावर.
चंद्र ज्याप्रमाणे शितलता देतो त्याप्रमाणे तुझा सहवास मला आणि माझ्या मनाला स्थैर्य देत असतं. मी प्रेमाच्या भानगडीत पडणार नव्हतो. पण तुझा जुळवून घेणारा स्वभावावर मी फीदा झालोय. तू मोठ्या घरातील असून सुद्धा माझ्याशी मैत्री केलीस, माझ्यावर जीव लावलास. तुझ्यात माझा जीव खूप गुंतलाय. मला आयुष्यभर साथ देशील का?
नसेल वचन महागड्या भेटीचे,
पण असेल साथ निखळ प्रीतीची,
वादळातही मी होईन ढाल,
तू फक्त सोबत राही माझी.
कॉलेज कॅटीनला तूला मी एका मुलासोबत पाहिलं तू त्याच्याशी गप्पा करत होतीस, त्यावरून मी थोडं नाराज होतो, त्यामुळे तिला रागावलो. पण तुला सांगू मी रागवलो जरी असलो तरी माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तुझ्याशिवाय मी माझाही विचार करू शकत नाहीये. मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. आय लव यू
तुझाच मी
संदीप
कोल्हापूर
मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?
जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!
प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!
आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...
भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.