पाकिस्तानात खळबळ! गोळीबारात लष्कर ए तोयबाचा शेख युसूफ आफ्रिदी ठार

Top Lashkar-e-Taiba Leader Killed: लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीची हत्या झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्कमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
Top Lashkar-e-Taiba Leader Killed:
saam tv
Published On
Summary
  • लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर युसूफ अफ्रिदी ठार

  • अज्ञात बंदूकधाऱ्यांनीआफ्रिदीवर गोळीबार केला आहे.

  • पाकिस्तानात लक्ष्यित हल्ल्यांची मालिका सुरू

पाकिस्तानातील दहशतवाद्यांमध्ये अज्ञात हल्लेखोरांची दहशत निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाच्या संस्थापक सदस्यपैकी एक असलेल्या अमीर हमजाचा हत्या झाली होती. आता पुन्हा अज्ञात बंदूकधाऱ्यांनी लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा हत्या केली आहे. युसूफ हा खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लष्करच्या नेटवर्कचा ब्रांच हेड होता. अज्ञात हल्लेखोरांनी युसूफवर धडाधड गोळ्या झाडत त्याचा खात्मा केला.

Top Lashkar-e-Taiba Leader Killed:
गोळीबारात ट्रम्प थोडक्यात बचावले, राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा यंत्रणा भेदून हल्ला

अज्ञात कुठून येतात आणि कुठे गायब होतात हे अद्यापही कळू शकलेले नाही. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वापासून ते पाकव्याप्त काश्मीरपर्यंत भारतविरोधी कारस्थान रचणारे दहशतवाद्यांमध्ये या हल्लेखोरांनी भीतीचं वातावरण निर्माण केलंय. २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत लाहौर, कराची आणि खैबर पख्तूनख्वामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या ३० हून अधिक टॉप कमांडर्सचा खात्मा झालाय. एप्रिल महिन्यात हाफिज सईदचा जवळचा सहकारी आमिर हमजा याचाही लाहोरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

Top Lashkar-e-Taiba Leader Killed:
Iran-US Conflict: आखाती युद्धात पाकिस्तान होरपळला; फुटला महागाईचा बॉम्ब

न्यूज चॅनेलच्या ऑफिसबाहेर हमजावर गोळीबार

लाहोरमध्ये दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अमीर हमजावर गोळीबार झाला होता. हमजा कारमध्ये बसत असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. अमीर हमजा हा लश्कर-ए-तैयबा संघटनेची स्थापना झाल्यापासून सक्रीय होता. तो एक महत्त्वाच्या दहशतवाद्यांपैकी एक होता. द्वेष परसरवणारी भाषणं आणि कट्टरपंथी लेखनासाठी तो कुप्रसिद्ध होता.

मशिदीबाहेर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचा खात्मा

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझरचा नातेवाईक कारी एजाज आबिद याची पेशावरमध्ये हत्याही काही अज्ञात हल्लेखोरांनी केली होती. एजाज आबिद तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना दहशतवादी बनवत होता. एजाज आबिद मशिदीबाहेर आला असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. एजाज आबिद हा 'सुन्ना वल जमात' नावाच्या संघटनेचा एक महत्त्वाचा सदस्य होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com