गोळीबारात ट्रम्प थोडक्यात बचावले, राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा यंत्रणा भेदून हल्ला

Donald Trump Attack: अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. अशातच आता वॉशिंग्टनमधील एका कार्यक्रमात पुन्हा एकदा ट्रम्प यांना हल्लेखोराकडून लक्ष्य करण्यात आलंय. नेमकं काय घडलंय ?
Donald Trump escorted by security after gunfire incident at a Washington event.
Donald Trump escorted by security after gunfire incident at a Washington event.saam tv
Published On

इराण-अमेरिका यांच्यात वाटाघाटी सुरू असतानाच ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय. वॉशिंग्टन येथील हिल्टन हॉटेलमध्ये 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर' सुरू असताना अचानक हल्लेखोरानं गोळीबार केला. या गोळीबारादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावलेत. त्यानंतर FBIनं या हल्ल्यातील संशयित हल्लोखोराची ओळख पटवलीय...

31 वर्षीय कोल थॉमस अॅलन हा कॅलिफोर्निया येथील रहिवासी आहे. अॅलन पेशानं टीचर आणि गेम डेव्हलपर आहे. तो ट्यूशन कंपनीमध्ये पार्ट-टाईम टीचर म्हणून काम करायचा. इतकंच नाहीतर त्याला डिसेंबर 2024 मध्ये टीचर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यामुळे पेशानं टीचर असलेल्या अॅलनने बड्या नेत्यांची मांदियाळी असलेल्या पार्टीत गोळीबार केल्याचं तपासात उघड झालंय.

तर दुसरीकडे, या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांमुळे सुखरूप असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय... खरतर ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची काही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही त्यांच्यावर प्राणघातक हल्ले करण्यात आलेत.

18 जून 2016 ला लास वेगासमध्ये ट्रम्प यांच्यावरील हत्येचा कट फसला. हल्लेखोरानं पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 10 ऑगस्ट 2020 मध्ये ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊसबाहेरच ठार केलं होतं. इतकंच नाहीतर 13 जुलै 2024 ला पेनसिल्वानियाच्या बटलरमध्ये भाषणावेळी हल्लेखोरानं ट्रम्प यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी कानाला चाटून गेल्यानं ट्रम्प जखमी झाले होते. तसंच, 15 सप्टेंबर 2024 ला फ्लोरिडातल्या वेस्ट पाम बिच येथे गोल्फच्या मैदानात बंदुकीसह तरुणाची घुसखोरी होती. जवानाच्या गोळीबारानंतर तरुणानं पलायन केलं होतं. त्यानंतर आता हॉटेल हिल्टनमध्ये डिनरवेळी हल्लेखोरानं गोळीबार केला. मात्र, या हल्ल्यातूनही ट्रम्प थोडक्यात बचावलेत..

खरंतर, ट्रम्प यांनी सत्ताबदल घडवण्यासाठी इराणवर हल्ले करून संपूर्ण जगाला युद्धाच्या खाईत लोटलं. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतच मोठा रोष उफाळून आलाय. काही दिवसांपूर्वीच अमेरीकेतील विविध राज्यांमध्ये 90 लाख नागरीकांनी रस्त्यावर उतरुन ट्रम्प यांच्या युद्धखोर वृत्तीचा निषेध केला होता. 'नो किंग्ज', 'ट्रम्प इज क्रिमिनल' असे पोष्टर झळकले होते. दरम्यान या ताज्या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याची शक्यता खुद्द ट्रम्प यांनी फेटाळून लावलीये. एव्हंढच नाहीतर असे हल्ले मला रोखू शकत नसल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलंय. मात्र, राष्ट्राध्यक्ष हजर असलेल्या ठिकाणाची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून अशा पद्धतीने हल्ले होत असतील तर अमेरिकन सुरक्षा यंत्रणांचं हे मोठं अपयशच म्हणावं लागेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com