शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग; १६ विद्यार्थिनींचा होरपळून मृत्यू , अनेकांची मदतीसाठी धावाधाव

kenya school fire : शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग लागल्याची घटना घडली. यात १६ जणांचा मृत्यू झाला.
kenya school fire news
kenya school fire Saam tv
Published On
Summary

केनियात शाळेच्या हॉस्टेलला लागली आग

आगीच्या दुर्घटनेत १६ विद्यार्थिनीचा मृत्यू

आगीच्या दुर्घटनेमुळे १६ कुटुंबावर दु:खाचा डोंगर

केनियातून मोठी बातमी हाती आली आहे. केनियाच्या नकुरू काऊंटी येथील गिलगिलच्या अकॅडमीतील शाळेच्या हॉस्टेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनींच्या हॉस्टेलला गुरूवारी पहाटे ३.३० वाजता आग लागली. या आगीच्या घटनेत १६ जणांच्या मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर एकूण ७४ विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.

केनिया रेड क्रॉस माहितीनुसार, आग लागल्याची सूचना मिळताच आपात्कालीन सेवा, रुग्णवाहिका पथक घटनास्थळी पोहोचलं. प्रशासनाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा दावा केला आहे.

kenya school fire news
पुण्यात भरधाव कारचा थरार; ६ दुचाकींसह रिक्षाला उडवले, ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

सुरुवातीला हॉस्टेलमधील १० विद्यार्थिनींच्या मृत्यू झाल्याची माहिती आली. परंतु हॉस्टेलला लागलेल्या आगीचा भडका वाढल्यानंतर आणखी विद्यार्थिनी आगीत होरपळल्या. त्यानंतर आणखी ६ विद्यार्थिनी आगीत दगावल्या. हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनींची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

kenya school fire news
Accident : लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; नववधूसह तिघांचा मृत्यू, भीषण अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा

केनियाचे राष्ट्राध्यक्ष विलियम रुटो यांनी घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पीडित कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी बचाव कार्य, जखमींवर उपचार आणि पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी आगीचे कारण शोधण्यासही सांगितलं आहे.

kenya school fire news
एकाच गावातील ८ मित्रांचा मृत्यू; भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली, थरकाप उडवणारा अपघात कसा झाला?

केनियामध्ये याआधी देखील आग लागल्याची घटना घडली होती. याआधी २००१ साली मचाकोस काऊंटीमध्ये भीषण आग लागण्याची घटना घडली होती. या आगीच्या घटनेत ६७ जणांचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त २०२४ आणि २०१७ साली आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. त्यामुळे शाळेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com