पंतप्रधानांनी दिला राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ; थेट इंग्लंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग

Keir Starmer Resigns Uk Pm Political Crisis: ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकप्रियतेत घट आणि पक्षांतर्गत दबावामुळे घेतलेला हा निर्णय ब्रिटनच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.
Keir Starmer announces his resignation as UK Prime Minister amid growing political pressure and declining public support.
Keir Starmer announces his resignation as UK Prime Minister amid growing political pressure and declining public support.saam tv
Published On

ब्रिटनच्या राजकारणातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांनी आपल्या पदाचा आणि लेबर पक्षाच्या नेतृत्वाचा रंजीमा दिला आहे. जुलै 2024 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे. नवीन लेबर नेत्याची निवड होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजीनाम्याची घोषणा करताना स्टार्मर यांनी जनतेचा कौल आणि नाराजी मान्य केल्याचे दिसून आले. पद सोडण्याची घोषणा करताना ते म्हणाले, माझा पक्ष संपला आहे, असे वारंवार सांगितले गेले. जनतेचा जो संदेश आहे, तो मी ऐकला आहे.

लोकप्रियतेत झालेली घट आणि पक्षांतर्गत दबाव

जुलै 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली लेबर पक्षाने घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांची आणि पर्यायाने पक्षाची लोकप्रियता देशात मोठ्या प्रमाणावर घसरली होती.

गेल्या आठवड्यात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या पोटनिवडणुकीत अँडी बर्नहॅम यांचा झालेला विजय हा स्टार्मर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव प्रचंड वाढला होता. अखेर या सर्व राजकीय घडामोडींनंतर स्टार्मर यांनी पद सोडण्याचा अंतिम निर्णय घेतला. आता लेबर पक्षाकडून नवीन नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com