
काल काश्मीर खोऱ्यात पैहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात निष्पाण पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी आता सर्च ऑपरेशन सुरु केलेलं आहे. दरम्यान, अजून ४-६ दहशतवादी लपले असल्याची माहिती समोर आली आहे.
पहलगाममध्ये सर्च ऑपरेशन सुरु
काल पहलगाम येथे झालेल्या या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर आता हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. काश्मीरच्या प्रत्येक खोऱ्यात हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन करत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अजून कोणी दहशतवादी लपले तर नाही ना त्याचा शोध घेतला जात आहे. अजून ६ दहशतवादी लपले असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच त्यांचा शोध घेतला जाईल.
देशभरात संतापाची लाट
काश्मीरमधील या हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी सर्वात आधी पर्यटकांना नाव विचारले त्यांचा आयडी पाहिला त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार केला. दहशतवादी हे पोलिसांच्या वेशात आले आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोबिंवलीतील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
एनआयए करणार तपास
पहलगाममधील या हल्ल्याचा तपास एनआयए करणार आहे. थोड्याच वेळाच सर्च ऑपरेशनसाठी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी पहलगाम येथे दाखल होणार आहे. त्याआधी हेलिकॉप्टरने दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा सोडून भारतात परतले
या हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान मोदी सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आहे. भारतात परतल्यावर दिल्ली विमानतळावरच त्यांनी बैठक घेतली आहे. पंतप्रधान मोदींना काल पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची संपूर्ण माहिती घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.