Pahalgam Terrorist Attack : मुस्लीम आहात का? आधी विचारलं मग बेछूट गोळीबार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू

Jammu and Kashmir Pahalgam Firing Kills 27 : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २० पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jammu and Kashmir Terrorist attack in Pahalgam
Jammu and Kashmir Terrorist attack in PahalgamSaam Tv News
Published On

जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरलं आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात हा दहशतवादी हल्ला झाला आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेनं परिरसरासह पुर्ण देशात खळबळ उडाली आहे. दहशतवादी हल्ल्यात काही पर्यटक जखमी देखील झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेथील काही दहशतवादी सैन्याच्या वेशात येऊन त्यांना 'तुम्ही मुस्लिम आहात का?' असा सवाल केला. पर्यटकांनी नाही उत्तर दिल्यावर दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत २७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये चार पर्यटक महाराष्ट्रातील तर दोन पर्यटक पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu and Kashmir Terrorist attack in Pahalgam
Shocking : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील अभिनेत्याने आयुष्य संपवलं; घरात आढळला मृतदेह, इंडस्ट्रीत खळबळ

दरम्यान, अनंतनाग पोलिसांनी पर्यटकांच्या मदतीसाठी २४/७ एक नंबर जारी केला आहे. कोणत्याही पर्यटकाला काही अडचण असल्यास किंवा अशा काही घटना दिसल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. नंबर - 9596777669 यावर पोलिसांनी संपर्क साधण्यास सांगितलं आहे तर, 9419051940 हा व्हॉट्सअप नंबर आहे.

Jammu and Kashmir Terrorist attack in Pahalgam
Solapur Crime : मला माफ करा, माझ्यात...; प्रसुती ८ दिवसांवर, गर्भवती महिलेनं आयुष्य संपवलं, सोलापूरमध्ये हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com