Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्याचा भ्याड हल्ला, महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू, पुण्यातील दोघांचा समावेश

6 tourists from Maharashtra died in Kashmir terror attack: दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यांनी पर्यटकांकडे ओळखपत्र मागितले आणि अचानक गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा आवाज ऐकून अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack
Published On

Pahalgam Terror Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन घाटीमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत २८ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण जखमी झाले आहे. डोंबिवली, पुणे आणि पनवेलमधील पर्यटकांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. नाव विचारले, आयडी पाहिले अन् पोलिसांच्या वेशात आलेल्या १० दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला.

डोंबिवलीतील ३ जणांचा मृत्यू-

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे. हे तिघेही आपल्या कुटुंबियांसह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. नातेवाइकांनी तातडीने तिघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिघेही या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समजले. या धक्कादायक वृत्ताने नातेवाइकांवर दुखाचा डोंगर कोसळला. तिघांचेही नातेवाईक तातडीने काश्मीरकडे रवाना झाले आहेत.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : नाव विचारलं अन् IB अधिकाऱ्यावर धाडधाड गोळीबार केला, कुटुंबासमोरच घेतला जीव

पनवेलमधील एकाचा मृत्यू -

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात पनवेल खांदा कॉलनीमध्ये राहणाऱ्या दिलीप देसले यांचा मृत्यू झालाय. तर सुभोद पाटील आणि माणिक पाटील हे या हल्ल्यात जखमी झाले. दोघांवर जम्मू काश्मीरमधील लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. देसले यांच्यासह पनेवलमधील ३९ जण जम्मू काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. बाकी सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात देसले यांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. उर्वरित नागरिक सुखरूप आहेत.

Pahalgam Terror Attack
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्याच्या भ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील ३ भावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

पुण्यातील दोन जणांचा मृत्यू

दहशतवद्याच्या भ्याड हल्ल्यात पुण्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये संतोष जगदाळे यांचा समावेश आहे. जगदाळे यांच्या पत्नी असावरी या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील कौत्सुब गणबोटे यांचाही या भ्याड हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

पुण्यातील संतोष जगदाळे यांना काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागल्या होत्या. उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पुण्यातील परिवारजनांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com