Pahalgam Terror Attack : नाव विचारलं अन् IB अधिकाऱ्यावर धाडधाड गोळीबार केला, कुटुंबासमोरच घेतला जीव

Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, यात २८ जणांचा मृत्यू. मृतांमध्ये आयबी आणि नौदल अधिकारी यांचा समावेश. महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणातील नागरिक हल्ल्यात बळी.
 Terror Attack
Pahalgam Terror AttackSaam tv
Published On

Pahalgam Terror Attack: काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसारन घाटीत मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, त्यामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या वेशात आलेल्या आठ ते दहा दहशतवाद्यांनी नावे विचारून धडाधड गोळ्या झाडल्या. यामध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यातील २८ जणांचा जीव गेला. दहशतवाद्यांनी कुटुंबासमोरच अनेकांचा जीव घेतला.या हल्ल्यामध्ये गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथे कार्यरत असलेल्या गुप्तचर विभागाच्या (IB) एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हा अधिकारी आपल्या कुटुंबासह सुट्टीवर पहलगामला गेला होता. कुटुंबासमोरच दहशतवाद्यांनी त्याला संपवले.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार,IB अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पण परंतु सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. हैदराबाद येथील गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, मृत्यू पावलेला अधिकारी गेल्या काही वर्षांपासून हैदराबाद येथे कार्यरत होता आणि त्याने अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. या हल्ल्यामुळे गुप्तचर विभागात शोककळा पसरली आहे. मृत अधिकाऱ्याच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत पुरवण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

 Terror Attack
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ पर्यटकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवविवाहित पत्नीसह फिरायला गेलेल्या नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल (वय २६) आपल्या नवविवाहित पत्नीसह जम्मू काश्मीरमध्ये फिरयाला गेला होती. दहशतवादी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. नरवाल हे कोची येथे कार्यरत होते. १६ एप्रिल रोजी हिमांशी नरवाल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

दहशतवाद्यांनी नरवाल यांना छाती मान आणि डाव्या हातात गोळ्या घातल्या होत्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मागे त्यांचे आई-वडील आणि एक बहीण आहे. त्यांचे वडील राजेश नरवाल हे पानिपत येथे जीएसटी विभागात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

 Terror Attack
Pahalgam Terror Attack: भयानक कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल; एकालाही सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना इशारा

वाढदिवस साजरा करण्यापूर्वी मृत्यू बँक कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईत कार्यरत असलेला आणि मूळचा सूरतचा शैलेश कालाथिया ४४ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये गेला होता. पण वाढदिवसाच्या एक दिवस आधीच दहशतवाद्यांनी त्याचा जीव घेतला. शैलेश कालाथिया आपली पत्नी शीतल, मुलगी नीती आणि मुलगा नक्ष यांच्यासह पहलगाममध्ये सुट्टीवर होता. त्यावेळी दहशतवाद्याच्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात गुजरातमधील अन्य तीन पर्यटक, विनुभाई दाभी, मणिका पटेल आणि रिनू पांडे जखमी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com