माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने थेट SBI बँक मॅनेजरच्या कानाखाली मारली; VIDEO व्हायरल

Kayalvizhi Slaps SBI Manager Viral Video Chennai: तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या नाती कयालविझी यांनी SBI बँक मॅनेजरला थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लिफ्टच्या वादातून घडलेल्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
KAYALVIZHI SLAPS SBI MANAGER IN CHENNAI | VIRAL VIDEO CONTROVERSY
KAYALVIZHI SLAPS SBI MANAGER IN CHENNAI | VIRAL VIDEO CONTROVERSYsaam tv
Published On

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधि यांची नात कयालविझी हिने State bank of india च्या बँक मॅनेजरला चापट मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात कयालविझी आधी मॅनेजरची खिल्ली उडवत असल्याचे आणि त्यानंतर अचानक त्याच्या कानाखाली मारताना दिसत आहे. लिफ्ट व्यवस्थित चालत नसल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे.

KAYALVIZHI SLAPS SBI MANAGER IN CHENNAI | VIRAL VIDEO CONTROVERSY
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारचा धडक निर्णय; 'या' धोकादायक तणनाशकावर देशात बंदी

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 20 जुलै रोजी अद्यार परिसरातील SBI NRI शाखेत घडली. कयालविझी या माजी केंद्रीय मंत्री एम.के. अलागिरी यांच्या मुलगी आहेत. त्या बँक मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन बोलत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. नंतर त्यांनी उठून थेट मॅनेजरच्या कानाखाली मारली. घटनेची वेळी जवळच एक व्यक्ती बसलेली दिसत आहे. जी कयालविझीचा हात पकडण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लिफ्टच्या समस्येवरून हा वाद झाला. ज्या इमारतीत कयालविझी यांच्या मालकीची असल्याचेही सांगितले जात आहे.

बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कयालविझी यांनी इमारतीत देखभाल तपासण्यासाठी भेट दिली असताना हा वाद झाला. तसेच बँक अधिकाऱ्याने त्यांना धमकी दिल्याचाही आरोप केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com