भयंकर! नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळली

nashik medical college lift collapse : नाशिकमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

नाशिकमधून धक्कादायक बातमी हाती आली आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. ज्योती अहिरे असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

दैनंदिन काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. लिफ्ट कोसळल्यानंतर घटनास्थळी तातडीने मुलांनी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलांनी आक्रोश केला. मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणी आडगाव पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजमधील या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com