Shocking: प्रसिद्ध भूतनाथ तलावात आढळले ६ जणांचे मृतदेह, आई आणि ५ मुलांसोबत नेमकं काय घडलं?

Karnataka News: कर्नाटकमध्ये एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह तलावात तरंगताना आढळून आले. प्रसिद्ध भूतनाथ तलावात ही घटना घडली. पोलिस तपास करत आहेत.
Shocking: प्रसिद्ध भूतनाथ तलावात आढळले ६ जणांचे मृतदेह, आई आणि ५ मुलांसोबत नेमकं काय घडलं?
Karnataka NewsSaam Tv
Published On
  • कर्नाटकच्या भूतनाल तलावात सहा जणांचे मृतदेह

  • विजयपुरामध्ये आई आणि पाच मुलांचा मृत्यू

  • भूतनाथ तलावात एकाच कुटुंबातील सहा मृतदेह आढळल्याने खळबळ

  • पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे

कर्नाटकमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. विजयपुरा जिल्ह्यातील प्रसिद्ध भूतनाल तलावातून एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. आई आणि ५ मुलांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हे सर्वजण गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. या सहा जणांसोबत नेमकं काय घडलं यामागचे कारण पोलिसांकडून शोधले जात आहे. सध्या सहाही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा आणि तिच्या ६ ते १५ वयोगटातील ५ मुलांचा समावेश आहे. हे कुटुंब २४ ऑगस्टपासून बेपत्ता झाले होते. तलावामध्ये सहाही जणांचे मृतदेह तरंगताना पाहून स्थानक नागरिक प्रचंड घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशम दलाच्या मदतीने सहाही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बीएलडीई रुग्णालयात पाठवले.

Shocking: प्रसिद्ध भूतनाथ तलावात आढळले ६ जणांचे मृतदेह, आई आणि ५ मुलांसोबत नेमकं काय घडलं?
Crime : घराला कुलूप लावून बाहेर पडताय? सावधान! मुंबईतील 'या' चोराची मोडस ऑपरेंडी ऐकून चक्रावून जाल

या सहाही जणांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक तपासानुसार, पोलिसांना संशय आहे की, हे कुटुंब फिरण्यासाठी तलावाच्या काठावर आले असावे. कुणीतरी पाय घसरून तलावात पडले असावे. यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात सहाही जण बुडाले असावेत. पण हा केवळ एक अपघात होता की यामागे कौटुंबिक हेतू किंवा कट होता? हा घातपात आहे की आत्महत्या? याचाही पोलिस तपास करत आहेत.

Shocking: प्रसिद्ध भूतनाथ तलावात आढळले ६ जणांचे मृतदेह, आई आणि ५ मुलांसोबत नेमकं काय घडलं?
Crime: IPS अधिकाऱ्याच्या आईची हत्या, घरामध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'तलावात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत सर्व मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठले. ते तलावापर्यंत कसे पोहोचले आणि ही घटना कशी घडली याचा तपास आम्ही घेत आहोत. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृतांची ओळख तात्काळ पटली नाही. पोलिसांनी जवळच्या सर्व गावांना आणि पोलिस ठाण्यांना याची माहिती दिली जेणेकरून मृतांची ओळख लवकर पटेल आणि घटनेमागचे नेमकं कारण समोर येईल.'

Shocking: प्रसिद्ध भूतनाथ तलावात आढळले ६ जणांचे मृतदेह, आई आणि ५ मुलांसोबत नेमकं काय घडलं?
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com