रक्षकच बनला भक्षक! अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षकाला ठोकल्या बेड्या

Karnataka PSI Arrest : कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षकाला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली पोक्सो कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.
Hingoli Crime
Hingoli CrimeSaam tv
Published On

Karnataka: Police Sub-Inspector Arrested In POCSO Case : खाकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील माणकी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) अभिनंदन यांना एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली भटकळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) 'पोक्सो' (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. भटकळ शहर पोलिसांकडून याची कसून चौकशी केल्यानंतर ही कारवाई केली. कर्नाटकात गेल्या काही दिवसांत पोलीस अधिकाऱ्यांकडून अल्पवयीन मुला-मुलींच्या छळाची ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Hingoli Crime
Shocking : कल्याण हादरलं! ७ वर्षाच्या मुलीवर ५५ वर्षाच्या नराधमाकडून बलात्कार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येल्लापूर तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पीएसआय अभिनंदन यांच्यावर आहे. पीडितेने या संदर्भात भटकळ शहर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली होती. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे भटकळ पोलिसांनी मंकी पीएसआय अभिनंदन यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि सखोल चौकशीनंतर अटक केली.

Hingoli Crime
Shocking : भयंकर! जन्मदात्या बापाने १९ वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात केली निर्घृण हत्या; धक्कादायक कारण समोर

मागील महिन्यात अमृतहळ्ळी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला चौकशीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएसआय प्रवीण यांना लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना वर्षापूर्वी घडली होती. आरोपी प्रवीणने मुलांना एका लॉजमध्ये नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यांना अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडले आणि हे सर्व आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केले. लैंगिक अत्याचाराचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Hingoli Crime
जळगाव हादरलं! जंगलात नेत 40 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार; अत्याचार करताना बनवला व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com