कल्याण पूर्वमधील कोळशेवाडी परिसरात धक्कादायक घटना
७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
५५ वर्षीय आरोपीला अटक
पुढील तपास सुरू आहे
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
Kalyan 7 Year Old Girl Rape Case कल्याणमधून संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या ७ वर्षीय चिमुरडीवर ५५ वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला असून आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ५५ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात पुढील तपस सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील कोळशेवाडी परिसरात पीडित मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या आरोपी जुमयी आली शेख (वय ५५) याने तिला टोमॅटो देतो सांगून घेऊन गेला. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबाने संतापून पोलीस ठाण्यात धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही काळात कल्याण पूर्व भागात अशा स्वरूपाच्या घटना समोर आल्याने स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. भाजप, शिवसेना (ठाकरे गट), मनसे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. अशा गुन्ह्यांमध्ये दोषींना कोणतीही दया न दाखवता जलदगती न्यायालयामार्फत शिक्षा व्हावी, अशी भूमिका विविध संघटनांनी मांडली.दरम्यान या प्रकरणानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.