देशाच्या राजकारणात खळबळ; राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

karnataka politics : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दारमैया यांनी आज राहुल गांधींची भेट घेतली.
karnataka political news
karnataka politicsSaam tv
Published On
Summary

कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्री सिद्दारमैया यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट

काँग्रेसच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कर्नाटकाच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्दारमैया यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची आज मंगळवारी भेट घेतली. या भेटीनंतर वरिष्ठांनी सांगितल्यास मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देईल, असे सिद्दारमैया यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री सिद्दारमैया यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांड हे सिद्दारमैया यांची समजूत काढत आहेत. या बैठकीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दारमैया, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार देखील दिल्लीला पोहोचले आहेत. या बैठकीमुळे कर्नाटकात मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, खासदार केसी वेणुगोपाल , इतर नेते उपस्थित आहेत.

karnataka political news
मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सूत्रांच्या माहितीनुसार, कर्नाटकात मागील काही महिन्यांपासून नेतृत्व बदलण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही महिन्यांत कर्नाटकातील काँग्रेसचे नेतृत्व बदलण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कर्नाटाकात डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु काँग्रेस पक्षाने हा दावा फेटाळून लावला आहे.

karnataka political news
मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार; संभाव्य तारीख आली समोर, राजकीय घडामोडींना वेग

बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री बदलण्यावरून कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटलं आहे. पक्षाने स्पष्ट म्हटलं की, सिद्दारमैया हेच पक्षाचे मुख्यमंत्री राहतील. त्यांना मुख्यमंत्रि‍पदावरून हटवण्याची कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही. काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाने सिद्दारमैया मुख्यमंत्रि‍पदावरून पाय उतार होण्यास सांगितलं आहे. सिद्दारमैया यांना सांगण्यात आलं आहे की, कोणताही निर्णय घ्याल, तो विचारपूर्वक घ्याल. त्यानंतर के सी वेणुगोपाल यांना कळवा. त्यामुळे सिद्दारमैया हे पुढील काही दिवसांत राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सिद्दारमैया हे राज्यसभेवर जाण्यास इच्छुक नाहीत. राहुल गांधी यांना सिद्दारमैया राज्यसभेवर जाण्याचा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com