मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार; संभाव्य तारीख आली समोर, राजकीय घडामोडींना वेग

Karnataka Cm Cabinet Reshuffle Likely May 4 Decision: कर्नाटकात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. काँग्रेस हायकमांड 4 मेपर्यंत मोठा निर्णय घेण्याची शक्यता असून डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे.
Senior Congress leaders meet high command amid rising speculation over Karnataka CM change and cabinet reshuffle.
Senior Congress leaders meet high command amid rising speculation over Karnataka CM change and cabinet reshuffle.saam tv
Published On

कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा आणि मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. राज्यातील अनेक वरिष्ठ मंत्री दिल्ली दौऱ्यावर गेले असून याआधीही 18 आमदारांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन राज्यात मंत्रिमंडळ फेरबदल करण्याची मागणी केली होती. या सगळ्या मुद्यावर काँग्रेस हायकमांड पुढील महिन्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री उशिरा सतीश जारकीहोळी आणि महादेवप्पा यांनी काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली. आज बी.के. हरिप्रसाद आणि के. एच, मुनियप्पा यांनी देखील कॉँग्रेस अध्यक्षांची भेट घेतली.

Senior Congress leaders meet high command amid rising speculation over Karnataka CM change and cabinet reshuffle.
मोठी बातमी! भाजपचा दणदणीत विजय; विरोधकांचा सुपडासाफ, 192 पैकी 158 जागा जिंकल्या

आज राज्यमंत्री के. एच. मुनियप्पा आणि हरियाणा काँग्रेसचे प्रभारी बी.के. हरिप्रसाद यांनी देखील काँग्रेस अध्यक्षांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा केली.राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे सत्ता बदलवण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणत आहेत, तर मुख्यमंत्र्यांना फक्त मंत्रीमंडळात फेरबदल हवा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी राज्य सरकारला 4 मे पर्यंत थांबण्यास सांगितले आहे.

Senior Congress leaders meet high command amid rising speculation over Karnataka CM change and cabinet reshuffle.
Petrol-Diesel Crisis: पेट्रोल मिळत नसल्याने तरुणाची सटकली, थेट दुचाकीच पेटवून दिली; VIDEO व्हायरल

कर्नाटकमध्ये नव्या नेतृत्वबदलाच्या चर्चा सुरू असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. एन. राजन्ना यांनी मंगळवारी एक महत्त्वपूर्ण विधान केले. राजन्ना यांनी म्हटले आहे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राहुल गांधींच्या निर्देशानुसार एकतर राजीनामा देण्यास किंवा सर्वोच्च पदावर कायम राहण्यास तयार आहेत. राजन्ना हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यांनी पक्ष नेतृत्वबदलाच्या होत असलेल्या चर्चेला पाठिंबा दिला. हे वक्तव्य कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना उद्देशून असल्याचे मानले जात आहे, ज्यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी त्यांचे समर्थक करत आहेत.

Senior Congress leaders meet high command amid rising speculation over Karnataka CM change and cabinet reshuffle.
Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

दरम्यान, कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकचे मंत्री जी. परमेश्वर यांनीही एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी मंगळवारी सांगितले की, काँग्रेस हायकमांड या विषयावर लवकरच प्रतिसाद देईल आणि हायकमांडचा निर्णय सर्वांना मान्य असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com