Crime News: महिलेने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा; घरी पोहोचताच व्यक्तीचा मृत्यू

Strange death case India: उन्नावमध्ये वादादरम्यान एका महिलेने तरुणाला चावा घेतल्याचा आरोप असून त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोस्टमार्टममध्ये कारण स्पष्ट नसल्याने व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे.
Strange death case India
Strange death case IndiaSaam Tv
Published On

उन्नावमध्ये घडलेली एक धक्कादायक आणि विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरतेय. उन्नावमध्ये वाद झाल्यानंतर एका महिलेने एका तरुणाच्या गुप्तांगाला चावा घेतल्याची घटना घडलीये. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर त्या तरूणाचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

महिलेशी वाद पडला महागात

मिळालेल्या माहितीनुसार, मौरांवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुण कर्नाटकातील भागलकोटमध्ये आइसक्रीम विक्री करून त्याच्या कुटुंबाचं पोट भरत होता. सुमारे महिनाभरापूर्वी तो आपल्या गावी आला होता. याच काळात त्याचा गावातील एका महिलेशी काही कारणावरून वाद झाला.

Strange death case India
Crime news India: बाप की सैतान! पोटच्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केली हत्या, पोलिसांकडून पित्याला अटक

या वादादरम्यान त्या महिलेनं संतापाच्या भरात तरुणाच्या हाताचा आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेतल्याचा आरोप आहे. घटनेच्या वेळी तरुणाची पत्नी आणि मुलं कर्नाटकातच असल्यामुळे तो काही दिवसांनी पुन्हा कामावर परत गेला.

अचानक बिघडली तब्येत

मात्र, कामावर गेल्यानंतर काही दिवसांतच त्याची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला गावी आणण्याचा निर्णय घेतला. मात्र बुधवारी गावाकडे परत येताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत संबंधित महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. तिचं म्हणणं आहे की, त्या महिलेच्या चाव्यामुळेच तिच्या पतीचा मृत्यू झाला.

Strange death case India
Doctor death case: मी तिला मारून टाकलं...! एनेस्थेसियाचा ओव्हरडोस देऊन डॉक्टरने केली पत्नीची हत्या, गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटमधून खुलासा

पोस्टमार्टमधून काय आलं समोर

पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं असता मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे पुढील तपासासाठी Viscera जतन करण्यात आला आहे. Viscera अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील खरी कारणं स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com