Doctor death case: मी तिला मारून टाकलं...! एनेस्थेसियाचा ओव्हरडोस देऊन डॉक्टरने केली पत्नीची हत्या, गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटमधून खुलासा

Kritika Reddy Murder Case: बेंगळुरूमध्ये डॉक्टर कृतिका रेड्डी यांच्या मृत्यू प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे झाले आहेत. मोबाईल चॅट आणि डिजिटल पुराव्यांमुळे पतीवर संशय वाढला आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत तपासाला गती दिली आहे.
Kritika Reddy Murder Case
Kritika Reddy Murder CaseSAAM TV
Published On

बंगळूरूमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. डॉक्टर कृतिका रेड्डी हिच्या मृत्यूमागचं रहस्य वाढत असून तपासातून दररोज नव्या गोष्टी समोर येतायत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या मोबाईल चॅट्समुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.

पतीवर गंभीर आरोप

या प्रकरणात कृतिका रेड्डीचे पती महेंद्र रेड्डी याच्यावरच संशय दाट आहे. तपास यंत्रणांच्या मते, महेंद्रने त्याच्या पत्नीला एनेस्थीसियाचा ओव्हरडोस देऊन तिची हत्या केली. त्यानंतर हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःच्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून गुन्हा लपवण्याचा डाव रचल्याचा आरोपही महेंद्रवर करण्यात आलाय.

चॅटमधून उघड झाला कट

आरोपी महेंद्रने त्याच्या कथित गर्लफ्रेंडला मेसेज करून ठेवला होता. यामध्ये त्याने म्हटलेलं की, आपलं नातं फक्त मैत्रीचं आहे असंच सांग. तसंच काही काळ संपर्क ठेऊ नको असंही सांगितल्याचं तपासात स्पष्ट झालंय.

Kritika Reddy Murder Case
Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

“मी कृतिकाला मारलं…”

या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या मोबाईलमधून एक असा मेसेजही समोर आला आहे, ज्यात तो स्वतःच गुन्ह्याची कबुली देतोय. “मी कृतिकाला मारलं… आता मला जेलमध्ये जावं लागणार” अशा आशयाचा मेसेज त्याच्या फोनमधून सापडल्याचं समोर आलंय. हा मेसेज तपासासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जातोय.

10 लाखांपेक्षा जास्त डिजिटल फाइल्सची तपासणी

फॉरेन्सिक टीमने जप्त केलेल्या डिव्हाइसची तपासणी केलीये. तब्बल 10.34 लाखांहून अधिक डिजिटल फाइल्स यावेळी तपासण्यात आला. यामध्ये शेकडो चॅट्स, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि डिलीट केलेल्या मेसेजचा समावेश आहे.

Kritika Reddy Murder Case
Crime news: मस्करी ठरली जीवघेणी! मित्राच्या गुप्तांगात भरली कंप्रेसरने हवा; पोट फुटून बाहेर आली आतडी, तरूणाचा मृत्यू

जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान सत्र न्यायालयाने महेंद्र रेड्डीचा जामीन अर्ज फेटाळलाय. न्यायालयाने सांगितलं की, प्रकरण अत्यंत गंभीर असून उपलब्ध पुरावे भक्कम आहेत. त्यामुळे सध्या तरी आरोपीला कोणतीही दिलासा देणं योग्य नाही.

Kritika Reddy Murder Case
Video Viral: पॅरासेलिंगदरम्यान दोरी तुटली आणि....! बागा बीचवर धक्कादायक घटना, व्हिडीओ समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com