

कर्नाटकात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला
दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली
या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला
बसमधील ३१ प्रवासी जखमी झाले आहेत
कर्नाटकमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाला. भरधाव बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि ३१ जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापट्टणा येथे पहाटे ४:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. बंगळूरुहून कोझिकोडला जाणारी प्रवासी बस समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रकच्या पुढील भागाचा चुराडा झाला. प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघांना रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
मृतकांमध्ये बस चालक सुनील आणि वाहक सुनद यांचा मृत्यू झाला. हे दोघेही कर्नाटकचे राहणारे होते. तर बसमधील प्रवासी आफताब या प्रवाशाचा मृत्यू झाला हा प्रवासी केरळमधील कोझिकोडचा रहिवासी होता. तर एका मृताची ओळख पटली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.
दरम्यान, अपघातामध्ये जखमी झालेल्या ३१ प्रवाशांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी प्रवाशांवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक कोंडी फोडली. पोलिस सध्या या अपघातामागचे कारण शोधत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.