Mysore Pak Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग घरीच बनवा तोंडात विरघळणारा स्वादिष्ट म्हैसूर पाक, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

म्हैसूर पाक बनवण्यासाठी १ कप बेसन, १ कप साखर, १ कप तूप आणि आवश्यकतेनुसार थोडे पाणी घ्या. चांगल्या टेक्सचरसाठी तूप ताजे आणि सुगंधी असणे महत्त्वाचे आहे.

Mysore Pak Recipe | Saam tv

बेसन भाजून घ्या

कढईत थोडे तूप गरम करून त्यात बेसन घाला. मंद आचेवर बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत हलके भाजून घ्या. बेसन जळणार नाही याची काळजी घ्या.

Mysore Pak

साखरेचा पाक तयार करा

दुसऱ्या कढईत साखर आणि थोडे पाणी घालून मध्यम आचेवर पाक तयार करा. पाकाला योग्य घट्टपणा येणे म्हैसूर पाकासाठी महत्त्वाचे आहे.

Mysore Pak Recipe | Saam Tv

बेसन आणि पाक एकत्र करा

साखरेचा पाक तयार झाल्यावर त्यात भाजलेले बेसन हळूहळू घाला आणि सतत ढवळत राहा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.

Mysore Pak Recipe | Saam Tv

तूप थोडं-थोडं घाला

मिश्रणात गरम तूप थोडे-थोडे घालत सतत ढवळत राहा. प्रत्येक वेळी तूप व्यवस्थित मिसळल्यानंतरच पुढचे तूप घालावे. यामुळे मिठाईला छान पोत मिळतो.

Mysore Pak Recipe | Saam Tv

मिश्रण सेट करण्यासाठी घ्या

मिश्रण कढईच्या कडांपासून सुटू लागले आणि तूप वेगळे दिसू लागले की ते लगेच तुपाचा हात लावलेल्या किंवा बटर पेपर लावलेल्या ताटात ओता. वरून सपाट करा.

Mysore Pak Recipe | Saam tv

तुकडे करून सर्व्ह करा

मिश्रण थोडे कोमट असतानाच सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे करून घ्या. पूर्ण थंड झाल्यावर म्हैसूर पाकचे तुकडे प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा.

Mysore Pak Recipe | Saam Tv

Palak Besan Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पालक बेसन चीला, वाचा सोपी रेसिपी

Palak Besan Chilla Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा