Shocking : व्यावसायिकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सून अन् मुलानेच सुपारी देऊन संपवलं

Kanpur Crime News : कानपूरमध्ये पैशांसाठी व्यावसायिक विनीत मिनो यांच्या हत्येचा धक्कादायक उलगडा. मुलगा, सून आणि घरातील नोकरावर हत्येचा कट रचल्याचा आरोप.
Vinit Mino Murder News
Vinit Mino Murder News Saam Tv
Published On
Summary
  • कानपूरमध्ये व्यावसायिक विनीत मिनो यांच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

  • पैशांसाठी हत्येची सुपारी दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

  • सुनेने आणि मुलाने मिळून हत्या केल्याचे समोर

  • या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले

पैशांसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. अगदी आपली नाती देखील त्यांना दिसेनाशी होतात. अशीच एक घटना कानपूरमध्ये घडली आहे. पैशांसाठी एका व्यवसायिकाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. ही हत्या व्यवसायिकाच्या मुलाने आणि सुनेने केली असल्याचं उघड झालं असून त्यांच्या या कटामध्ये त्यांच्या घरातील नोकर असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत व्यवसायिकाच्या मुलासह ३ जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील कानपूर शहरामधील इंदिरा नगर येथील 'रतन ऑर्बिट अपार्टमेंट्स'मध्ये शनिवारी रात्री हे हत्याकांड घडलं . मृत व्यक्तीचं नाव विनीत मिनो असे आहे. विनीत मिनो त्यांच्या कुटुंबियांसह इंदिरा नगरमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा सून आणि नातू राहत होता. विनीत यांच्या सुनेला पैशांची प्रचंड हाव होती. तसेच मिनो हे मुलाकडून आणि सुनेकडून प्रत्येक खर्चाचा हिशोब मागायचे याचा राग दोघांच्याही मनात होता.

Vinit Mino Murder News
EPFO Update : PF बॅलन्स कसा तपासायचा? 'या' सोप्या पद्धतीने मिनिटांत समजेल रक्कम, जाणून घ्या

याच रागातून विनीत यांची सून शालूने त्यांचा काटा काढायचा ठरवला. शालूने त्यांच्या घरात काम करणारा जुना नोकर विशालला ६ लाख रुपये देऊन मारण्यासाठी सांगितले. दरम्यान ठरल्याप्रमाणे विशालने विनीतचा काटा काढण्यासाठी आपल्या साथीदारासह त्यांच्या घरात घुसला. घरात घुसताच त्याने विनीत यांच्या अंगावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विनीत यांचा जागीच मृत्यू झाला.

Vinit Mino Murder News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

ही घटना घडली तेव्हा विनीत यांची सून आणि मुलगा पार्टीसाठी बाहेर गेले होते. दरम्यान त्यांनी पार्टीवरून परतल्यानंतर आपण काहीच केले नाही असे दाखवत पोलिसांना फोन करून घडलेल्या घटनेबाबत सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घरात लावलेले सीसीटीव्हीच्या फुटेजवरून त्यांनी विनीत यांचा जुना नोकर विशालला ताब्यात घेतलं आणि हत्येचा उलगडा होत गेला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

Vinit Mino Murder News
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

पोलिसांच्या तपासानुसार, विनीत यांच्या हत्येपूर्वी त्यांची सून शालू आणि मुलगा सुब्रत यांचा घरातील पूर्वीचा नोकर विशाल याच्याशी सातत्याने संपर्क होता. कॉल डिटेल्सनुसार, शालूने विशालला सुमारे 30 वेळा, तर सुब्रतने तब्बल 300 वेळा फोन केल्याचे समोर आले आहे. म्हणजेच या तिघांमध्ये जवळपास 330 फोन कॉल्स झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. दरम्यान यानंतर पोलिसांनी मृत विनीत यांच्या सुनेचीचौकशी केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला. याप्रकरणी आता विनीत यांची सून आणि नोकर विशाल, त्याचा साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com