पक्षातील नेते मला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याचा डाव आखतायत... केंद्रीय मंत्र्यांचा गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

Juel Oram Alleges BJP Leaders Plotting To Remove Him From Union Cabinet: केंद्रीय मंत्री जुएल ओराम यांनी भाजपमधील काही नेते आपल्याला मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा गंभीर आरोप केला.
JUEL ORAM ALLEGES BJP CONSPIRACY TO REMOVE HIM FROM UNION CABINET
JUEL ORAM ALLEGES BJP CONSPIRACY TO REMOVE HIM FROM UNION CABINETsaam tv
Published On

केंद्रीय आदिवासी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जुएल ओराम यांनी आपल्याच पक्षातील सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहे. भाजपमधील काही नेते आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवण्यासाठी आणि आपली राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप जुएल ओराम यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांममुळे ओडिशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

JUEL ORAM ALLEGES BJP CONSPIRACY TO REMOVE HIM FROM UNION CABINET
Shiv Sena case: निवडणूक आयोगाने अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्या? शिवसेना नाव-चिन्हाच्या वादात कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तीवाद

या प्रकरणावर जुएल ओराम यांनी याआधी प्रतिक्रिया देताना कायद्याने आपले काम करावे आणि कायदेशीर कारवाईला आपली कोणतीही हरकत नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. सुंदरगड लोकसभा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा खासदार राहिलेल्या जुएल ओराम यांनी भाजपमधील काही नेते आपल्याला बदनाम करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत असल्याचा आरोप केला. आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून हटवले गेले, तर आपल्याला मंत्रीपद मिळेल, असा काही नेत्यांचा समज असल्याचे त्यांनी म्हटले.

JUEL ORAM ALLEGES BJP CONSPIRACY TO REMOVE HIM FROM UNION CABINET
Shiv Sena SC Case Live : आजची सुनावणी संपली, कोर्टानं दिली पुढची तारीख, वाचा युक्तिवादाचा शब्द ना शब्द

या राजकीय कटानंतर आपण आपला निर्णय बदलल्याचेही ओराम यांनी स्पष्ट केले. याआधी आपण पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आपण 2029 ची लोकसभा निवडणूक नक्की लढवणार असीन आपल्या विरोधकांचा सामना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

JUEL ORAM ALLEGES BJP CONSPIRACY TO REMOVE HIM FROM UNION CABINET
आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

आपल्याविरोधात सुरू असलेल्या या षडयंत्रामागे नेमके कोणते लोक आहेत, याचा आपण शोध घेणार असल्याचे ओराम यांनी म्हटले. या संदर्भात आपण ओडिशा भाजप संघटन महामंत्र्यांकडेही तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याच संवादादरम्यान ओराम यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची आणि 'त्यांचे हात कापण्याची' क्षमता आपल्यात असल्याचे वक्तव्य ओराम यांनी केले.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com