जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

JNU Professor : JNUमधील ११ विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकाविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. मे महिन्यातील व्हायवा परीक्षेदरम्यान कथित आक्षेपार्ह टिप्पणी आणि अतिरिक्त गुणांबाबत केलेल्या आरोपांची ICC चौकशी करत आहे.
JNU Professor
11 JNU students harassment complaint against professor
Published On: 
Summary
  • एका प्राध्यापकाविरोधात ११ विद्यार्थ्यांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या

  • लैंगिक मागणी मान्य केल्यास अतिरिक्त गुण देण्याचा संकेत दिल्याचा आरोप

  • एका विद्यार्थ्याने आपला अनुभव अनधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही तक्रारी केल्या

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील 11 विद्यार्थ्यांनी एका प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. हे प्रकरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या तोंडी परीक्षेशी (व्हायवा) संबंधित आहे. वृत्तानुसार, प्राध्यापकाने तोंडी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांशी लैंगिक सूचक टिप्पणी केली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, एका विद्यार्थ्याने प्राध्यापकाची ही टिप्पणी एका अनधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केली. त्यानंतर इतर अनेक विद्यार्थ्यांनीही प्राध्यापकावर असेच आरोप केलेत. सूत्रांनुसार, प्राध्यापक अतिरिक्त गूण देण्याच्या मोबदल्यात विद्यार्थ्यांकडे लैंगिक सुखाची मागणी करत.

JNU Professor
JNU Teaser: 'जेएनयू' चित्रपटाचा धमाकेदार टीजर आऊट, तुम्ही पाहिला का?

मे महिन्याच्या अखेरीस अंतर्गत तक्रार समितीकडे (आयसीसी) तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर समितीने अनेक विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले. या तक्रारीनंतर जेएनयूमध्ये सुमारे 45 दिवसांची सत्र-सुट्टी घेण्यात आली. जुलैच्या मध्यावर वर्ग पुन्हा सुरू झाल्यानंतर, विद्यार्थ्यांमध्ये या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली. जेएनयू प्रशासनाने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

JNU Professor
Mumbai Crime: मुंबईत जिममध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाचं भयंकर कृत्य

जेएनयूएसयूने आरोप केला की, काही प्राध्यापक विद्यार्थ्यांना विनाकारण मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रयोगशाळेत काम करण्यास सांगतात. प्रयोगशाळेची वेळ यूजीसीच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित केली पाहिजे. संशोधकांना त्यांच्या संशोधन प्रकल्पांसाठी रात्री उशिरापर्यंत काम करणे आवश्यक आहे की नाही, हे ठरवण्याची परवानगी दिली पाहिजे.

या आधीही झालेत होते असे लैंगिक छळाचे आरोप

एप्रिल 2025 मध्ये, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले. यामध्ये स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील वरिष्ठ प्राध्यापक स्वर्ण सिंग यांचा समावेश होता. जपानी दूतावासातील एका अधिकाऱ्याने सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला होता. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सिंग यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीनंतर त्यांनी तक्रार दाखल केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com