

मुंबईत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
विलेपार्ले ट्रेनिंग सेंटरमध्ये घडली घटना
मल्लखांब प्रशिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा
द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकावर गंभीर आरोप करण्
मुंबई पोलिसांकडून अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल
गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या प्रशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले. मुंबईतल्या विलेपार्लेमध्ये ही संपातजनक घटना घडली. विलेपार्ले पूर्वेकडील एका ट्रेनिंग सेंटरमध्ये मल्लखांब प्रशिक्षक गणेश देव्रुखकरने (४८ वर्षे) संधी साधून १६ वर्षीय अल्पवयीन प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीने महाविद्यालयीन शिक्षक आणि आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेनंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिताअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी काही दिवसांपासून सरावासाठी जिममध्ये जात नव्हती. याचदरम्यान तिला आरोपीकडून ‘हाय’ असा मेसेज आला. मुलीने आईला याबाबत माहिती देत मेसेज का केला?, अशी विचारणा केली असता आरोपीने तिला जिममध्ये बोलावल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर मुलगी सकाळी ११ वाजता जिममध्ये गेली असता तिथे ती एकटीच असल्याचे समोर आले. आरोपीने तिला शूज आत ठेवण्यास सांगितले. ती शूज ठेवण्यासाठी गेल्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करून तिच्याशी जबरदस्ती केली आणि लैंगिक अत्याचार केले. यानंतर पीडित मुलगी प्रचंड घाबरली. तिने कॉलेजमध्ये जाऊन या घटनेची माहिती मैत्रिणीला दिली त्यानंतर ही संतापजनक घटना समोर आली.
या घटनेनंतर आरोपीने याबाबत कोणालाही सांगू नको, असे मुलीला धमकावल्याच्या आरोपीवर आरोप आहे. मात्र घाबरलेल्या मुलीने कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला घटनेची माहिती दिली. ती रडू लागल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी तिला शिक्षकांना याबाबत सांगण्यास सांगितले. त्यानंतर मुलीने ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिकेला आणि आपल्या पालकांना घटनेची माहिती दिली. पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.