Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...

Jharkhand Wedding News: झारखंडमध्ये एका तरुण-तरुणीचं लग्न थंडीमुळे मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्न मंडपातून नवरीला न घेता नवरदेव तसाच घरी परत गेला. या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे
Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Jharkhand Wedding NewsSaam TV
Published On

लग्न म्हटलं की प्रत्येक तरुण-तरुणींच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. पण बऱ्याचदा काही कारणास्तव लग्न मोडल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. लग्न मोडण्यामागं अनेक कारणं असतील पण थंडीमुळे लग्न मोडलं असं कारण तुम्ही कधी ऐकले नसेल. तर झारखंडमध्ये एका तरुण-तरुणीचं लग्न थंडीमुळे मोडल्याची घटना समोर आली आहे. लग्न मंडपातून नवरीला न घेता नवरदेव तसाच घरी परत गेला. लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत...

झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील मोहनपूर येथे राहणाऱ्या एका तरुणाला कडाक्याच्या थंडीमध्ये लग्न करणं महागात पडलं आहे. सात फेरे घेण्यापूर्वीच या तरुणाचे लग्न मोडलं. घोरमारा येथे राहणाऱ्या तरुणाचे बिहारमधील एका तरुणीशी लग्न ठरले. लग्नामुळे तरुण आणि तरुणीच्या घरी आनंदाचे वातावरण होते. दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने एका गार्डन कॅम्पसमध्ये लग्न करण्याचे ठरले.

Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Agri Koli Marriage : एकाच दिवशी साखरपुड्यासह लग्नाच्या विधीसाठी बक्षीस; हॉलही मिळणार मोफत, आगरी कोळी समाजासाठी उपक्रम

तरुण-तरुणीचे कुटुंब लग्नाच्या ठिकाणी पोहचले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. विधीला देखील सुरूवात झाली. गार्डनमध्ये लग्न असल्यामुळे स्टेज गार्डनच्या मध्यभागी बांधण्यात आला होता. तरुण-तरुणींनी एकमेकांना वरमाला घातल्या त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सातफेरे घेण्यासाठी नवरा-नवरी मंडपात आले. पंडितांनी विवाह विधीला सुरूवात केली. विधी सुरू असतानाच अचानक नवरदेव बेशुद्ध पडला.

Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Marriage Tips: वय झालंय पण लग्न जुळत नाही? मग या सोप्या टीप्स करा फॉलो

नवरदेवाचे अंग थंडीमुळे थरथर कापत होते. नवरदेवाच्या कुटुंबीयांना ताबडतोब त्याला एका खोलीमध्ये नेले आणि त्याचे हातपाय चोळले. त्यानंतर डॉक्टरांना बोलावण्यात आले. त्याला इंजेक्शन देऊन सलाईन लावण्यात आली. एक ते दीड तासानंतर नवरदेवाची प्रकृती ठिक झाल्यानंतर तो पुन्हा मंडपात आला. पण नवरीने लग्न करण्यास नकार दिला.

Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Shweta Tiwari Third Marriage: श्वेता तिवारीचं तिसरं लग्न? ८ वर्षांनी लहान अभिनेत्यासोबतचे फोटो झाले व्हायरल

नवरीने सांगितले की, तरुणाला काही तरी आजार आहे. त्यामुळे मी त्याच्याशी लग्न करणार नाही. नवरीला संशय आला कारण नवरदेवाच्या लग्नाची मिरवणूक त्यांच्या घरातून नवरीच्या घरी येते पण या लग्नात नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेवाच्या घरी बोलावण्यात आले होते आणि एका गार्डनमध्ये लग्न ठेवण्यात आले होते. नवरीने नकार दिल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाले. पहाटे ५ वाजेपर्यंत त्यांचा वाद सुरू होता.

Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Marriage : अबब..! 10 मुलांच्या बापाने 20 वर्ष लहान मुलीशी केलं लग्न, न्यायालयाने दिला हा अजब निर्णय

दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद झाला तेव्हा याची माहिती मोहनपूर पोलिस ठाण्यात देण्यात आली. याबाबत माहिती मिळताच मोहनपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही कुटुंबीयांना समजावून सांगितले. मात्र नवरीने लग्नाला नकार दिला. ती लग्न करायला तयार होत नव्हती त्यामुळे अखेर सकाळी ८ वाजता नवरदेव नवरीला न घेता असाच निघून गेला आणि नवरी आपल्या कुटुंबीयांसोबत बिहारला निघून गेली.

Jharkhand News: थंडीमुळं लग्न मोडलं; लग्नाच्या हॉलमध्ये नवरदेवासोबत घडलं भयंकर...
Marriage Certificate : प्रत्येक विवाहित महिलेकडे मॅरेज सर्टिफिकेट असायलाच हवं, अन्यथा भविष्यात येतील अडचणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com