Marriage Certificate : प्रत्येक विवाहित महिलेकडे मॅरेज सर्टिफिकेट असायलाच हवं, अन्यथा भविष्यात येतील अडचणी

Marriage Certificate Impoartance : प्रत्येक विवाहित महिलेने मॅरेज सर्टिफिकेट काढायला हवे. मॅरेज सर्टिफिकेट काढले नाही तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणी येऊ शकतात.
Marriage Certificate
Marriage CertificateSaam Tv
Published On

लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. मुलींसाठी लग्न हा खूप महत्त्वाचा क्षण असतो. लग्न केल्यानंतर मुलेचे पूर्ण आयुष्यच बदलून जाते. मुलीच्या नावापासून ते अगदी घर सर्वकाही बदलते.लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट असणे खूप महत्त्वाचे असते.

भारतात मॅरेज सर्टिफिकेट बनवणे अनिवार्य नाही आहे. परंतु जर मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच लग्नानंतर लग्नाचे प्रमाणपत्र काढणे गरजेचे आहे.

Marriage Certificate
Modi Government Schemes: हक्काचे घर ते अपघात विमा; मोदी सरकारच्या या ६ योजना माहित आहेत का?

लग्नानंतर जर एखाद्या महिलेला तिचे नाव बदलायचे असेल किंवा पत्ता बदलायचा असेल तर त्यांना मॅरेज सर्टिफिकेटचा वापर करता येईल. अनेक लोक मॅरेज सर्टिफिकेट बनवत नाही. विवाहाची नोंदणी न केल्याने त्यांच्या लग्नाच्या वैधतेवर परिणाम होत नाही. तरीही मॅरेज सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. लग्नानंतर अनेकदा कौटुंबिक हिंसाचार, छळ अशा अनेक गोष्टी घडतात. त्या परिस्थितीत जर तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल मॅरेज सर्टिफिकेटची गरज भासते.

अनेकदा पतीच्या निधनानंतर पत्नीला मालमत्तेवरचा हक्क मिळवण्यासाठी समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर अडचणी वाढतील.अनेकदा विवाहित जोडप्यांचे लग्नानंतर पटत नाही. या काळात लग्नाची नोंदणी झाली असेल तर घटस्फोट घेण्यास अडचणी येत नाही. त्याचसोबत तुम्हाला कुठे बाहेर जायचे असेल तर व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी मॅरेज सर्टिफिकेट मिळवण सोपे जाते.

Marriage Certificate
Post Office Scheme: नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, फक्त व्याजातूनच मिळणार २ लाख रुपये; जाणून घ्या कसे?

मॅरेज सर्टिफिकेट कसं काढायचं?

तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढू शकतात. ऑनलाइन पद्धतीने मॅरेज सर्टिफिकेट काढण्यासाठी सर्वप्रथम Mahaegram Citizen Connect अॅप तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर तिथे तुम्हाला विवाह नोंदणी असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती, लग्नाचा पुरावा ही सर्व माहिती सबमिट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेटचा मेसेज येईल.

Marriage Certificate
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com