काँग्रेस आमदारावर लैंगिक शोषणाचा आरोप; राजकारणात खळबळ

Congress MLA Bhushan Bara Physical Abuse Allegations: झारखंडमधील काँग्रेस आमदार भूषण बाडा यांच्यावर १५ वर्षीय आदिवासी मुलीने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण लागले असून पत्नी जोशिमा यांनी आरोप फेटाळत राजकीय षडयंत्राचा दावा केला आहे.
JHARKHAND CONGRESS MLA BHUSHAN BARA
JHARKHAND CONGRESS MLA BHUSHAN BARAsaam tv
Published On: 

झारखंडमधील सिमडेगा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार भूषण बाडा यांच्यावर एका १५ वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपांमुळे झारखंडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदार भूषण बाडा यांच्या पत्नी जोशिमा यांनी पतीवरील सर्व आरोप फेटाळून लावत हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसमधीलच काही लोक या कटात सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

JHARKHAND CONGRESS MLA BHUSHAN BARA
भीषण अपघात! ट्रक आणि मिनीबसची जोरदार धडक; १६ जणांचा मृत्यू

सिमडेगा जिल्ह्यातील १५ वर्षीय आदिवासी मुलीने रांचीमधील धुर्वा परिसरातील आमदार निवासात आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसांकडे दिलेल्या अर्जात जबरदस्तीने अत्याचार करणे, अमानुष वागणूक देणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. तसेच आपल्याला गर्भपातही करावा लागल्याचा दावा पीडितेने केला आहे. या प्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आला आहे.

JHARKHAND CONGRESS MLA BHUSHAN BARA
Weather Update: पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 19-20 नोव्हेंबरला वादळ धडकणार; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ मध्ये दोन महिलांनी शिक्षणाची आणि शाळेत प्रवेश मिळवून देण्याची हमी देत तिला सिमडेगा येथील आमदार निवासात आणले. त्यानंतर तिला रांची येथील आमदार निवासात नेण्यात आले. तिथे तिच्याकडून घरगुती कामे करून घेतली जात असल्याचा आरोप आहे. रांची आणि सिमडेगा येथील दोन्ही निवासस्थानी आपल्यासोबत अमानुष वागणूक दिली जात असल्याचा दावा पीडितेने केला आहे. काम करताना थोडाही उशीर झाल्यास मारहाण केली जात होती, शिवीगाळ केली जात होती आणि पोटभर जेवणही दिले जात नव्हते, असे तिने अर्जात म्हटले आहे. विरोध केल्यास आपले कोणीही नाही आणि आपल्याला इथेच राहावे लागेल, अशी धमकी दिली जात असल्याचाही आरोप आहे.

JHARKHAND CONGRESS MLA BHUSHAN BARA
दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार, दोन महिलांसह चौघांचा मृत्यू

दरम्यान, आमदार भूषण बाडा यांनी स्वतःवरील सर्व आरोप निराधार आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. पीडित मुलगी स्वतःहून आरोप करत नसून काही लोक तिच्याकडून आरोप करवून घेत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे काही लोक घाबरले असून त्यातूनच हे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपला मतदारसंघ मागासलेला असून अनेक लोक आपल्याकडे येतात. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासह राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आपण करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदित्य साहू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधीवर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणासह गर्भपातासारखे गंभीर आरोप होणे ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुलीला शिक्षण देऊन तिचे भविष्य घडवण्याचे आश्वासन देत आमदार निवासात आणण्यात आले आणि तिचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचा आरोप साहू यांनी केला. पीडित मुलीने आमदारांच्या कुटुंबीयांवरही मारहाण, शिवीगाळ तसेच शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप केले आहेत. सत्तेचा गैरफायदा घेऊन एका असहाय मुलीला धमकावले जात असल्याचा गंभीर प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होत असल्याचेही आदित्य साहू यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.