

१४ नोव्हेंबरपर्यंत त्याची तीव्रता वाढून वेल मार्क्ड लो प्रेशरमध्ये रूपांतर होण्याची शक्यता.
१५ नोव्हेंबरच्या आसपास डिप्रेशन तयार होण्याचा IMD चा अंदाज
काही जिल्ह्यांसाठी १८ आणि १९ नोव्हेंबरला पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज
बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हे वादळ १९-२० नोव्हेंबरच्या आसपास किनारपट्टीवर धडकू शकते. हवामानविषयक विविध मॉडेल्समध्ये या वादळाच्या मार्गाबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आलेत. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. या क्षेत्राची तीव्रता वाढून १४ नोव्हेंबर रोजी अधिक कमी दाबाच्या क्षेत्रात आणि १५ नोव्हेंबर रोजी चक्रीवादळपूर्व स्थितीतील (डिप्रेशन) रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर पश्चिम दिशेने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल. १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी मध्य बंगालवर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
युरोपियन मॉडेलनुसार, हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकू शकते. दरम्यान, इतर दोन मॉडेल्स असे दर्शवतात की ते बांगलादेश किंवा म्यानमारच्या दिशेने वळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अंदमानच्या समुद्रात आणि त्या आजूबाजुच्या परिसरात चक्रीवादळाचं वातावरण तयार झालंय. आज आग्नेय बंगालच्या उपसागराच्या भागात याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे.
१५ नोव्हेंबरपर्यंत दक्षिण बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागात हे अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर 'डिप्रेशन'मध्ये (कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात) होऊ शकते. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार, विविध हवामान मॉडेल्समध्ये या प्रणालीच्या अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याबाबत बऱ्यापैकी एकमत आहे. मात्र हे चक्रीवादळ कोणत्या मार्गाने जाईल आणि नेमक्या कोणत्या ठिकाणी जमिनीवर धडकेल याबद्दल विविध मॉडेल्सचे अंदाज वेगवेगळे आहेत.
या कारणास्तव, वादळाचा संभाव्य मार्ग आणि त्याचा परिणाम याबद्दल भारतीय हवामान विभागाने अद्याप कोणताही स्पष्ट अंदाज दिलेला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वादळाची दिशा आणि त्याचा परिणाम यांबाबतची स्थिती तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा एक 'डिप्रेशन' (कमी दाबाचे क्षेत्र) तयार होईल. दुसरीकडे भुवनेश्वर हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसापर्यंत ओडिसामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते, १७ते १८ नोव्हेंबरच्या आसपासचे राज्याच्या हवामानत बदल होऊ शकतो.
१७-१८ नोव्हेंबरपासून ओडिशामध्ये हवामानात बदल होणार आहे. एसओए (SOA) मधील 'सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट' (CEC) चे संचालक डॉ. शरत चंद्र साहू यांनी सांगितले की, सध्याची हवामान स्थिती पाहता, तेथे 'डिप्रेशन' (कमी दाबाचे क्षेत्र) किंवा 'डीप डिप्रेशन' (अधिक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र) निर्माण होण्याची शक्यता आहे. हे अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
त्यांच्या अंदाजानुसार, १९ नोव्हेंबरच्या रात्री किंवा २० नोव्हेंबरच्या सकाळी आंध्र प्रदेशच्या कावली ते मछलीपट्टनमच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार आहे. असे घडल्यास, १७-१८ नोव्हेंबरपासून ओडिशामध्ये हवामानात बदल दिसून येऊ शकतो. सुरुवातीला गंजाम, गजपती आणि पुरी जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण ओडिशामधील कोरापुट, नबरंगपूर, मलकानगिरी, रायगडा आणि गजपती जिल्ह्यांत अधिक जोरदार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.