भीषण अपघात! ट्रक आणि मिनीबसची जोरदार धडक; १६ जणांचा मृत्यू

Assam Truck And Minibus Accident Near Kaziranga: आसाममधील काझीरंगा येथे ट्रक आणि मिनीबसची भीषण धडक झाली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत.
Kaziranga accident today
Kaziranga accident todaysaam tv
Published On: 

आसाममधील काझीरंगा येथे गुरुवारी भीषण अपघात झाला. ट्रक आणि मिनीबस यांच्यात जोरदार धडक होऊन या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमीपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काझीरंगाजवळील रोंगाजन परिसरात हा अपघात झाला. बोखाखाट येथून नागावच्या दिशेने जाणाऱ्या मिनीबसला एका ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मिनीबसचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातामुळे बसमधील अनेक प्रवासी वाहनात अडकले होते.

Kaziranga accident today
दोन वाहनांवर अंदाधुंद गोळीबार, दोन महिलांसह चौघांचा मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुरुवातीला या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र, बचावकार्यादरम्यान बसमधून मृतदेह बाहेर काढले जात असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Kaziranga accident today
भाजप नेत्याची लोखंडी रॉडने वार करून हत्या; घटनेने राजकारणात खळबळ

दरम्यान, राष्ट्रीय उद्यानाजवळ लागू करण्यात आलेल्या वेगमर्यादेच्या निर्बंधांचे उल्लंघन करून मिनीबस भरधाव वेगाने जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिनीबस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर ट्रकला धडक बसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास केला जात आहे. या दुर्घटनेबाबत आसाम सरकारकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.