Shocking : गरोदर गर्लफ्रेंडच्या पाणीपुरीत मिसळलं विष; बॉयफ्रेंडचं हादरवणार कृत्य; नेमकं कारण काय? वाचा

Jharkhand Crime News : झारखंडमध्ये प्रियकराने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीत विष देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Shocking : गरोदर गर्लफ्रेंडच्या पाणीपुरीच्या मिसळलं विष; बॉयफ्रेंडचं हादरवणार कृत्य; नेमकं कारण काय? वाचा
Jharkhand Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • गरोदर प्रेयसीला विषारी पाणीपुरी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न

  • पीडितेला उलट्या व प्रकृती बिघडल्यानंतर संशय निर्माण

  • जंगलात नेऊन हल्ला; तरुणीची धाडसी सुटका

  • पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक करून तपास सुरू

पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. मात्र याच आवडीचा फायदा घेऊन एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रामकांडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. करण (बदलेलं नाव ) आणि सिमरन (बदलेलं नाव ) हे दोघेही गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. करणने सिमरनला लग्न करण्याचं आमिष देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्यांना एक मूल झाले. करण आणि सिमरनचे प्रेमसंबंध गावात वाऱ्यासारखे पसरले. समाजाच्या विरोधामुळे दोघेही वेगळे झाले. मात्र काही महिन्यांनी करण पुन्हा सिमरनला जाऊन भेटला.

Shocking : गरोदर गर्लफ्रेंडच्या पाणीपुरीच्या मिसळलं विष; बॉयफ्रेंडचं हादरवणार कृत्य; नेमकं कारण काय? वाचा
Kalyan Dombivli : केडीएमसीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत;महापौर, उपमहापौर बिनविरोध, तरीही महासभा का नाही? कुणाचा दबाव?

त्यानंतर पुन्हा त्यांनी ठेवलेल्या शरीरसंबंधातून सिमरन ८ महिन्यांची गरोदर राहिली. सिमरनने मात्र त्यानंतर करणकडे लग्न करण्याचा तगादा लावला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. करणने सिमरनला संपवण्याचा कट रचला. सिमरनला पाणीपुरी आवडते म्हणून त्याने पाणीपुरी आणली. परंतु ही साधीसुधी पाणीपुरी नव्हती तर, या पाणीपुरीमध्ये करणने विष मिसळलं होत.

Shocking : गरोदर गर्लफ्रेंडच्या पाणीपुरीच्या मिसळलं विष; बॉयफ्रेंडचं हादरवणार कृत्य; नेमकं कारण काय? वाचा
Malad Fruit Seller : फळांना लावलं जातंय उंदीर मारण्याचं औषध, मुंबईकरांच्या जीवाशी खेळ; संतापजनक Video व्हायरल

पाणीपुरी खाऊन झाल्यावर पीडितेला उलट्यांचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला तो सामान्य असल्याचं तिला वाटलं. मात्र नंतर तिला अधिक त्रास होऊ लागल्याने तिने आरोपीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची विनंती केली. आरोपीने रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तरुणीला एका घनदाट जंगलात घेऊन गेला. तिथे तिच्यावर हल्ला करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तिथून स्वतःची सुटका करत जीव वाचवला आणि तातडीने पोलीस ठाणे गाठत प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com