मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. हायकोर्टाने जामीन मंजूर केल्याने नरेश गोयल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. ५३८ कोटी रुपयांच्या एका घोटाळ्याप्रकरणात जामीन मंजूर झालाय. कर्करोगाच्या उपचारासाठी देण्यात आलेला अंतरिम जामीन उच्च न्यायालयाकडून कायम करण्यात आला आहे.
कर्करोगाच्या उपचारासाठी जामीन मिळावा, यासाठी गोयल यांनी याचिका दाखल केली होती. गोयल यांना हायकोर्टानं आधी दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यानंतर या जामीनाची मुदत एक महिन्यासाठी वाढवण्यात आली होती. गेल्यावर्षी ईडीने या घोटाळा प्रकरणी नरेश गोयल यांना अटक केली होती.
जेट एअरवेजवर २०१८-१९ सालात वाईट काळ सुरु होता. त्यावेळी कंपनीने कॅनेरा बँकेकडून ५३८ कोटींहून अधिक कर्ज घेतलं होतं. त्यानंतर २०२१ साली कॅनेरा बँकेने मोठे आरोप केले होते. बँकेने म्हटलं होतं की, जेट एअरवेजने 'रिलेटेड कंपन्यांना' १,४१०.४१ कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. कंपनीने खात्यातून पैसे काढण्यासाठी टान्सफर केले'.
बँकेच्या म्हणण्यानुसार, एअरलाइनच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आढळलं की, 'नरेश गोय आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर कर्मचाऱ्यांचा पगार, फोन बिल, वैयक्तिक खर्च हे जेट एअरवेजच्या खात्यातून केल्याचा आरोप आहे. यामुळे १ सप्टेंबर २०२३ रोजी ईडीने नरेश गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.