बदलत्या जीवनशैलीमुळे तुमच्या खाण्यातही बदल होत असतो. त्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो. तुम्ही बाहेरचे अन्न पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते म्हणजेच तुमची भूक भागवायला तुम्ही बाहेरचे अन्न पदार्थ खाता, मात्र त्याने तुमच्या पोटाला लगेचच अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कारण सतत बद्धकोष्ठता हे कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. कोलन किंवा कोलोरेक्टल कॅन्सरला मोठ्या आतड्याचा कर्करोग देखील म्हणतात.
कर्करोग हा मोठ्या आतड्यात (कोलन) किंवा गुदाशयाच्या आतड्यांसंबंधी मार्गाच्या शेवटच्या भागात होतो. बहूतेक लोक या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, जे नंतर घातक ठरू शकतात. योग्य वेळी त्याची ओळख झाली तर त्यावर उपचारही होऊ शकतात. जाणून घेऊया या कॅन्सरबद्दल...
आतड्यांसंबंधी कर्करोग वाढण्याचे कारण
तुम्ही रोज बाहेरचे जंक फूड खात असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्ही कामानिमित्त एखादे वेळेस किंवा महिन्यातून एकदाच बाहेरचे कोणतेही पदार्थ खावू शकता. शक्यतो बाहेर जाताना तुम्ही एक खाऊचा डबा कॅरी करु शकता.
तुम्ही रोज बाहेरचे जंक फूड खात असाल तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्ही कामानिमित्त एखादे वेळेस किंवा महिन्यातून एकदाच बाहेरचे कोणतेही पदार्थ खावू शकता. शक्यतो बाहेर जाताना तुम्ही एक खाऊचा डबा कॅरी करु शकता. तसेच तुम्ही जास्त प्रमाणात मांस खात असाल त्यामुळे सुद्धा कर्करोगाची होऊ शकतो.
तुम्ही जर सतत चीज, बटर प्रेमी असाल तर त्यावरचे प्रेम करा त्याने तुम्हाला बद्धकोष्टतेचा त्रास होतो आणि पुढे कर्करोगाची लागण होऊ शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही दारू आणि सिगारेटचे व्यसन करत असाल तर तुम्हाला कर्करोग होवू शकतो.
Written By : Sakshi Jadhav