प्रत्येकाला जग भ्रमंती करण्याची हौस असते. देशात फिरण्याची हौस असते. प्रत्येकाला तिथे जाण्याची , तिथले वातावरण अनुभवण्याची इच्छा असते. मात्र त्यांचे बजेट आपल्याला दरवेळेस परवडत नाही. त्यामुळे आपण लांब फिरण्याचे किंवा परदेशात फिरण्याचे प्लॅन कधीच करत नाही. आता तुमचा प्लॅन कॅन्सल होणार नाही.
नुकतेच थायलंडने भारतीय पर्यटकांना एक सवलत दिली आहे. त्यात तुम्ही थायलंड मध्ये व्हिसा शिवाय जावू शकता. आणखी काही सुविधा खास भारतीयांसाठी देण्यात आल्या आहेत त्या तुम्हाला पुढील माहिती द्वारे कळतील.
थायलंडने भारतीय नागरिकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश धोरणाची अनिश्चित काळासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. हे धोरण भारतीय नागरिकांना स्थानिक इमिग्रेशन कार्यालयात 30 दिवस मुदत वाढवण्याच्या पर्यायासह , व्हिसाशिवाय थायलंडमध्ये 60, दिवसांपर्यंत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
थायलंड मधील प्रसिद्ध ठिकाणे पुढील प्रमाणे आहेत.
फि फि बेट
उत्तरेकडील चियांग माई
फुकेत बेट
अयुथया
पट्टाया
नाखोन पथोम
सयामी मांजरी
अशा प्रकारची विविध स्थळे तुम्ही फिरु शकता. तसेच फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत तुम्ही फिरण्याचा प्लॅन करु शकता.
Edited By: Sakshi Jadhav