नाचोस चाट रेसिपी
घरच्या घरी हेल्दी आणि कुरकुरीत नाचोस चाट तयार करा एकदम सोप्या पद्धतीने. नाचोस हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे. ज्याचा लोक कधीही आस्वाद घेवू शकतात. तुम्ही नाचोस सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी ट्राय करू शकता, इथे आम्ही तुम्हाला नाचोस चाट कसा बनवायचा ते सांगणार आहोत.
ही रेसिपी आज करण्याचे कारण म्हणजे आज दि. ६ नोव्हेंबर रोजी नॅशनल नाचोस डे साजरा केला जातो. नाचोस हे प्रत्येक तरुणाच्या आवडीचा पदार्थ मानला जातो. चला तर तयार तरु घरगुती स्टाईलने नाचोस रेसिपी.
साहित्य
नाचोस ( तुम्ही घरगुती किंवा विकत वापरु शकता.)
चिरलेली काकडी
चिरलेला कांदा
चिरलेला टोमॅटो
मेयोनीज
चाट मसाला
काळे मीठ
उकडलेले कणीस
हिरवी मिरची बारिक चिरलेली
कोथिंबीर बारिक चिरलेली
केचप
लाल तिखट
आवडीनुसार बारिक शेव
कृती
सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. नंतर एका भांड्यात चिरलेली काकडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मेयोनीज, केचप, चाट मसाला, तिखट आणि काळे मीठ घालून चांगले मिक्स करा. आता एक सुरेख डिजाइनचे ताट घ्या आणि त्यात नाचोस व्यवस्थित पसरवून ठेवा. आता तयार मिश्रण नाचोसवर लावा आणि वर उकडलेले कणीस त्यावर ठेवा.
आता शेवने नाचोस सजवा आणि लगेच सर्व्ह करा. ते सर्व्ह करण्यासाठी तुम्ही वेगळी पद्धत सुद्धा अवलंबू शकता. यासाठी ताटाभोवती नाचोस ठेवा आणि नंतर मध्यभागी थोडी जागा सोडा. आता या रिकाम्या जागेत भाज्यांचे मिश्रण ठेवा. नंतर शेव घालून सर्व्ह करा. ही अगदी सोपी आणि एकदम चविष्ट चटपटीत अशी रेसिपी आहे. तुम्ही लहान मुलांना सुद्धा घरच्याघरी हा चाट तयार करुन देवू शकता. त्याने मुलं बाहेरचे, उघड्यावरचे खाद्य पदार्थ खाणे नक्कीच टाळतील.
Written By: Sakshi Jadhav