ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्या निरोगी आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप आवश्यक आहे.
दररोज शरीराला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांना व्हिटॅमिन डीची कमतरता जाणवते.
नागरिकांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमी असल्यास आपल्याला नैराश्य, झोप, सांधे दुखी, आणि एकाग्रताच्या समस्या उद्भवू लागतात.
दररोज शरीरासाठी आवश्यक असा सूर्यप्रकाश घेतल्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी देखील मिळते आणि आपला मूड, प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
सूर्यप्रकाश घेण्याची योग्य वेळ सकाळी ८ ते ११ आहे.
प्रत्येकाने दररोज १५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्यायला हवा.
NEXT: घरातून नकारात्मक उर्जा बाहेर काढायची? तर 'या' वास्तू टिप्स फॉलो करा