महाराष्ट्रामध्ये हिवाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात विविध ऋतूनुसार पदार्थ खाल्ले जातात. तर हिवाळ्यात तुम्ही गाजराचे सेवन केलेले शरीरासाठी खूप फायदेशीर असते. भारतात हिवाळ्यात जवळपास प्रत्येक घरात गाजराचा हलवा बनवण्याची परंपरा आहे. पण हो, त्यासाठी थोडा संयम आणि थोडाच वेळ लागतो. गाजर फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया हिवाळा ऋतू स्पेशल डिश गाजराचा हलवा रेसिपी.
गाजराचा हलवा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
२ वाट्या किसलेले गाजर
साजूक तूप पाव वाटी
दूध १ ते २ वाट्या (गरजेनुसार)
साखर २ ते ३ वाट्या आवडीनुसार
खवा पाव किलो
वेलची पावडर १ चमचा
काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप - प्रत्येकी ८ ते १०
कृती
सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवून कोरडे करुन मग किसून घ्यायचे. आता एक कढईमध्ये तूप अॅड करा आणि त्यामध्ये गाजर छान लालसर होईपर्यंत परतून घ्या. खमंग झाल्यासारखे वाटले की एका वाटीत खवा घेऊन त्यात दूध अॅड करुन तो हाताने किंवा स्मॅशरने स्मॅश करा. पुढे हे मिश्रण कढईत अॅड करा.
आता साखर घालून सगळे चांगले जिन्नस एकजीव करुन घ्या. खवा, साखर आणि गाजर चांगले एकजीव होईपर्यंत परतायचे आणि घट्टसर होईपर्यंत थोडी वाफ येऊ द्यायची. सगळ्यात शेवटी वेलची पूड आणि सुकामेव्याचे काप घालायचे. हलवा खूप घट्टसर वाटला तर अंदाजे दूध घालायचे नाहीतर तूप, खवा आणि साखरेचा ओलावा गाजर शिजण्यास पुरेसा असतो. पुढे परता आणि घट्टसर होईपर्यंत थोडी वाफ येऊ द्या. चला तयार झाला तुमचा झटपट गाजराचा हेल्दी हलवा.
Edited By: Sakshi Jadhav