Jeffrey Epstein Photo : ६८ फोटो अन् चॅट्स रिलीज, बिल गेट्स महिलांसोबत दिसले, एपस्टीन फाईल आज सार्वजनिक होणार

Jeffrey Epstein new files photo release : जेफ्री एपस्टीन प्रकरणातील ६८ फोटो आणि चॅट्स सार्वजनिक करण्यात आले आहेत. यामध्ये जगातील प्रभावशाली व्यक्ती दिसत असून अमेरिकेत राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Epstein photos release
Epstein photos releaseSaam TV marathi News
Published On

jeffrey Epstein New Files Photo : जेफ्री एपस्टीन याच्या संपत्तीतून मिळालेल्या ६८ नवे फोटो अमेरिकेतील हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्ह्समधील डेमोक्रॅट सदस्यांनी सार्वजनिक केले आहेत. यामध्ये बिल गेट्स विविध महिलांसोबत दिसत आहेत. त्याशिवाय काही चॅट्सही समोर आले आहेत. त्यामध्ये मुलींचा व्यवहार केल्याचे दिसतेय. एपस्टीन याच्या सर्व फाईल आज अमेरिका अन् जगभरात सार्वजनिक केल्या जाणार आहेत. यामध्ये कुणाची नावे येणार, भारतात काय परिणाम होणार? याबाबत राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. (Jeffrey Epstein seized assets photos)

एपस्टीन याचे जगभरातील प्रभावशाली व्यक्तींसोबत असलेल्या संबंधांचा पर्दाफाश करणे हा या फोटो जाहीर करण्यामागील उद्देश आहे. एपस्टीन याचा २०१९ मध्ये तुरूंगात मृत्यू झाला होता. त्याच्या निधनाआधीच ९५,००० फोटो जप्त करण्यात आले होते. त्या फोटोमधील काही निवडक फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहेत. एपस्टीन याचे जगभरातील प्रभावशाली व्यक्तींसोबत संबंध होते. श्रीमंत व्यक्तीसोबत तो दिसत असल्याचे आज प्रसिद्ध झालेल्या फोटोतून समोर येतेय.

Bill Gates Epstein,
Bill Gates Epstein,
Epstein photos release
भाडं मागायला गेली, भाडेकरूंनी घरमालकिणीसोबत असं काही केलं की सगळेच हादरले, बेडरूममध्ये...

नुकतेच प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, चित्रपट निर्माते वुडी अॅलन, गुगलचे सह-संस्थापक सर्गेई ब्रिन, नोम चॉम्स्की आणि ट्रम्पचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचा समावेश आहे. या प्रसिद्ध झालेल्या अनेक फोटोंपैकी काही फोटोंमध्ये बिल गेट्स महिलांसोबत दिसत आहेत. त्याशिवाय काही फोटोंमध्ये महिलांच्या अंगावर काही मेसेज लिहिलेले दिसत आहेत. तर चॅट्समध्ये महिला पुरवल्याचेही दिसत आहे.

Epstein case update
Epstein case update
Epstein photos release
भाजपचा डाव काँग्रेसच्या जिव्हारी, २ माजी आमदारांनी घेतलं कमळ, शेकडो समर्थकांनी सोडली साथ
Epstein case update
Epstein case update

एपस्टीन प्रकरणातील सर्व फाइल्स, फोटो आज जगभरात सार्वजनिक करणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधीच काही फोटे अन् चॅट्स प्रसिद्ध कऱण्यात आले आहेत. फोटोमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा एपस्टीनसोबत संबंध असल्याचे दिसतेय. यामधून कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. हाउस ओवरसाइट कमिटीचे डेमोक्रॅट नेते रॉबर्ट गार्सिया यांनी याबाबत मत व्यक्त केलेय. ते म्हणाले की, कमिटी एपस्टीन संपत्तीतून मिळालेल्या हजारो फोटोंची पडताळणी करत आहे. यामधून पीडितांची ओळख प्रसिद्ध करण्यात येणार नाही.

Epstein photos release
Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

आज प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये काही धक्कादायक गोष्टीही समोर येत आहे. व्लादिमीर नाबोकोव्ह यांच्या lolita या कादंबरीतील काही ओळी महिलांच्या छातीवर अन् अंगावर लिहिलेल्या दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये कादंबरीतील आणखी काही ओळी एका महिलेच्या पायावर लिहिलेल्या दिसत आहेत. इतकेच नाही तर रशिया, युक्रेन, दक्षिण आफ्रिका आणि लिथुआनियासह अनेक देशांचे पासपोर्ट, व्हिसा आणि ओळखपत्रेही दिसत आहेत. एका अज्ञात व्यक्तीसोबत आलेल्या टेक्स्ट मेसेजचे स्क्रीनशॉट देखील प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामध्ये १८ वर्षाच्या रशियन महिलेची एका भेटीची किंमत ठरवत असल्याचे दिसतेय.

Jeffrey Epstein files
Jeffrey Epstein files
Epstein photos release
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भावाच्या जागेत १४५ कोटींचं ड्रग्ज सापडलं, अंधारेंचा आरोप, प्रकाश शिंदे म्हणाले....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com