Jammu Kashmir : पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड सूत्रधाराचा खात्मा,सुरक्षा दलांची मोठी कारवाई

Jammu Kashmir Encounter News Update : जम्मू-काश्मीरमधील बडगामच्या यूसमर्ग परिसरात सुरक्षा दलांची दहशतवादविरोधी कारवाई. चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा सुलेमान शाह उर्फ ‘मूसा’ ठार.
JAMMU KASHMIR LET TERRORIST MUSA KILLED IN BUDGAM ENCOUNTER
JAMMU KASHMIR LET TERRORIST MUSA KILLED IN BUDGAM ENCOUNTERSaam Tv
Published On: 
Summary
  • जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

  • लष्कर-ए-तैयबाशी संबंधित सुलेमान शाह उर्फ ‘मूसा’ ठार झाल्याची अधिकाऱ्यांनी माहिती

  • दूधपथरीच्या दुर्गम जंगल परिसरात मुसाचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स आणि इतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत सुलेमान शाह उर्फ ‘मूसा’ ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेला मूसा गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. पीर पंजाल पर्वतरांगांच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कोराग आणि यूसमर्ग परिसरात संयुक्त मोहिम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान जवानांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.

JAMMU KASHMIR LET TERRORIST MUSA KILLED IN BUDGAM ENCOUNTER
Cancer : धूम्रपान करत नाहीत तरीही होतोय कॅन्सर, महिलांनो तुमच्या घरात दडलंय याचं उत्तर

या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. वन क्षेत्र असलेल्या दूधपथरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा दलांचं अभियान सुरू होतं. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून तपासणी आणि शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली.

JAMMU KASHMIR LET TERRORIST MUSA KILLED IN BUDGAM ENCOUNTER
Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

विशेष म्हणजे, याच महिन्याच्या सुरुवातीला यूसमर्गच्या डोंगराळ भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या कारवाईत मूसा बचावून पसार झाला होता. मात्र, त्याचा जवळचा साथीदार यासिर याचा ५ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला होता. यानंतर सुरक्षा दलांनी मुसाचा शोध घेण्यासाठी कारवाई तीव्र केली होती. अखेर बडगाममधील कारवाईत मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी नेटवर्कविरोधातील कारवाईच्या दृष्टीने ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com