Pahalgam Attack on Jagdale and Ghanghote family from Pune Karvenagar
Pahalgam Attack on Jagdale and Ghanghote family from Pune KarvenagarSaam Tv News

Pahalgam Terror Attack : पुण्यातल्या पर्यटकांना नावं विचारली, मग गोळीबार; कर्वेनगरमधील दोनजण जखमी

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे.
Published on

जम्मू-काश्मीर (पहलगाम) : जम्मू काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या दहशतवादी हल्यामध्ये एकूण २७ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. या जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांना नावे विचारली आणि नंतर त्यांना गोळ्या घातल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांवर देखील मोठं संकट ओढवलं आहे. एकूण जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पहलगाम येथे झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ (TRF) दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. हल्लेखोर सैन्याच्या गणवेशात आले होते. तसंच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या अशी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे. पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पहलगामला पर्यटनासाठी गेलं होतं. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत होतं. त्यावेळी त्यांच्यासमोर अचानक दहशतवादी आले. हे कुटुंब पुण्यातील कर्वेनगरमधील जगदाळे आणि घनघोटे कुटुंबीय असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन्ही पुरुषांवर गोळ्या झाडल्याची देखील माहिती समोर आली आहे.

या पर्यटकांना दहशतवाद्यांनी नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे. तर पुण्यातील कर्वे नगरमधील दोन दाम्पत्य जखमी झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com