J & K : जम्मू काश्मिरात २ दहशतवाद्याचा खात्मा; काश्मिरी पंडित संजय शर्मांची हत्या करणाऱ्याला यमसदनी धाडलं

सुरक्षा दलाचे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Jammu and kashmir
Jammu and kashmirSaam tv
Published On

जम्मू आणि काश्मीर : काश्मिरातील अवंतीपोरातून मोठं वृत्त समोर आलं आहे. अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चमकीमध्ये सुरक्षा दलाचे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दहशतवाद्यामध्ये पंडित संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्याचा देखील सामावेश होता. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील (Kashmir) अवंतीपोरात भागात भारतीय सैन्यात आणि दहशतवाद्यामध्ये चकमक झाली. चकमकीत पुलावामामध्ये पंडित संजय शर्मा यांची हत्या करणारा दहशतवादी मारला गेला आहे. अवंतीपोरात सोमवारी-मंगळवारी उशिरा रात्री चकमक सुरू झाली होती. (Jammu And kashmir Latest News)

Jammu and kashmir
PM Modi's Brother Hospitalized : पंतप्रधान मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी रुग्णालयात दाखल; काय आहे कारण?

एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत मारला गेलेला दहशतवादीची ओळख आकिब मुस्ताक भट या नावाने झाली आहे. मारला गेलेला दहशतवादी हा टीआरएफ या दहशवादी संघटनेसाठी काम करायचा. मारला गेलेला दहशतवादी हा संजय शर्मा यांच्या हत्या करण्यात त्याचा देखील हात होता.

Jammu and kashmir
Bihar Marriage : 6 महिन्यात तरूणीची 3 लग्न, ग्रामस्थांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण वाचून धक्का बसेल

दरम्यान, अवंतीपोरामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याचे (Soldier) दोन जवान जखमी झाले. जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला. तर दुसऱ्या जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अद्याप पुष्टी मिळाली नाही. भारतीय सैन्याने संजय शर्मा यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याची ४८ तासांत हत्या केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com