

गुलमर्गमध्ये केबल कार सेवेत तांत्रिक बिघाड
जवळपास ३०० पर्यटक हवेतच अडकले
तांत्रिक बिघाडानंतर परिसरात भीतीचं वातावरण
जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या गुलमर्गमधून मोठी बातमी हाती आली आहे. गुलमर्गमधील प्रसिद्ध गोंडाला केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली. या बिघाडामुळे जवळपास ३०० पर्यटक हवेतच अडकले. या घटनेने पर्यटक आणि नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्यास सुरुवात केली.
उत्तर काश्मीरमध्ये उंच डोंगरावर पर्यटकांना घेऊन जाणारी केबल कार सेवा अचानक बंद पडली. केबल कार सेवा तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्यानंतर जवळपास ३०० पर्यटक हवेतच अडकले. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, रोपवेत पर्यटक अडकल्यानंतर परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
पर्यटक अडकल्यानंतर सैन्य दलाची राजपुताना रायफल्स, जम्मू आणि काश्मीर पोलीस, स्थानिक प्रशासनाचं पथक मदतीला धावलं. प्रशासनाने सर्व पथकांना बचाव कार्यासाठी तातडीने पाठवलं. बचाव पथकाने सुरक्षितरित्या सर्व पर्यटकांची सुटका केली. सर्व पथकाने काळजीपूर्वक काही पर्यटकांना जमिनीवर उतरवलं. आताही सर्व पथकाकडून रेस्क्यू ऑपरेसन सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांना रोपवेतून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. या घटनेनंतर डॉक्टरांचं पथक देखील तयार करण्यात आलं. तातडीने बचावकार्य केल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेत कोणीही जखमी झालं नाही.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तांत्रिक बिघाडाच्या कारणाचा तपास केबल कार सेवेचे कर्मचारी आणि इंजिनीअर करत आहेत. प्रशासनाने पर्यटकांना बचाव पथकाच्या जवानांना सहकार्य करण्याची सूचना केल्या आहेत.
गुलमर्ग गोंडोला ही आशियातील सर्वात मोठी केबल कार सिस्टिम आहे. गुलमर्ग हे भारतीय आणि विदेशी पर्यटकांचे आवडीचे पर्यटनस्थळ आहे. गुलमर्ग भागात पर्यटनातून व्यापारी, व्यावसायिकांची चांगली कमाई होते. रोप वे अडकण्याच्या घटना वारंवार घडू नयेत, याची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.