

जम्मू बंटलाबमध्ये पुलाचा भाग कोसळला
पुलाच्या ढिगाऱ्याखाली मजूर दबले
मजुरांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू
जम्मूच्या बंटलाबच्या ठर भागात शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. एक पुलाच्या विस्ताराचं काम सुरू होतं. त्याचवेळी दुर्घटना घडून ६ मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक मजुरांच्या मदतीला धावून अभियान सुरू केलं.
जम्मू काश्मीर पोलीस, एसडीआरएफ, भारतीय सेना आणि स्थानिक लोकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. आतापर्यंत २ मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. तर ४ मजूर ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना काढण्याचे काम सुरू आहे. मशीनच्या मदतीने ढिगारा बाजुला हटवण्याचे काम सुरू आहे.
सध्या घटनास्थळी बचाव कार्य जलदगतीने सुरू करण्यात येत आहे. घटनेने भीतीचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाली आहे. पुलाचा एक भाग कोसळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. काही मजुरांनी पळ काढत जीव वाचवला. परंतु कोसळलेल्या भागाखाली ६ मजूर दबले गेले आहेत. त्यांतील काहींना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
दुर्घटना घडल्यानंतर पोलीस मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. एसडीआरएफ, भारतीय सैन्य दल, स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. दोन मजुरांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ४ मजुरांविषयी कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्याचा शोध सुरू आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचा शोध लागेना झाला आहे. त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. मजुरांचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची याचिका कुटुंबीय करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.