Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

Jal Jeevan Mission ₹960 Crore Scam: कथित ९६० कोटी रुपयांच्या जल जीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी एसीबीने मोठी कारवाई केली आहे. माजी आयएएस सुबोध अग्रवाल यांना दिल्लीत अटक करण्यात आली आहे.
Jal Jeevan Mission ₹960 Crore Scam:
Former IAS officer Subodh Agarwal arrested by ACB in connection with ₹960 crore Jal Jeevan Mission scam.
Published On
Summary
  • जल जीवन मिशनच्या ९६० कोटी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई

  • माजी आयएएस अधिकारी सुबोध अग्रवाल अटकेत

  • एसीबीकडून आधीच १० आरोपींना अटक

जल जीवन मिशनच्या कथित ९६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) माजी आयएएस अधिकारी सुबोध अग्रवालला अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतून त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. एसीबीनुसार, या प्रकरणात १० आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर चार जण फरार होते. यापैकी सुबोध अग्रवालला दिल्लीतील एका सार्वजनिक ठिकाणाहून सकाळी ११:३० च्या सुमारास अटक करण्यात आली.

Jal Jeevan Mission ₹960 Crore Scam:
Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

जल जीवन मिशनच्या कथित ९६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) माजी आयएएस अधिकारी सुबोध अग्रवालला अटक करण्यात आली आहे. नवी दिल्लीतून त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे महासंचालक गोविंद गुप्ता यांनी या अटकेला दुजोरा दिला आहे. एसीबीनुसार, या प्रकरणात १० आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, तर चार जण फरार होते. यापैकी सुबोध अग्रवालला दिल्लीतील एका सार्वजनिक ठिकाणाहून सकाळी ११:३० च्या सुमारास अटक करण्यात आली.

Jal Jeevan Mission ₹960 Crore Scam:
Beed : बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

दरम्यान या प्रकरणातील इतर तीन आरोपींविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. संजीव गुप्ता, मुकेश आणि जितेंद्र सध्या फरार आहेत. या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, १७ फेब्रुवारीपासून सातत्याने अटकसत्र सुरू आहे. फरार आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर, म्हणजेच त्यांचे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडे अनेकवेळा पथके पाठवण्यात आली. काहीवेळा तपास पथकाच्या हाती धागेदोरे लागले, परंतु प्रत्येक वेळी आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com