हातात बेड्या, आता अंगावर खाकी! जेलमध्ये राहून MPPSC परीक्षा दिली; थेट DSP पदाला गवसणी

MPPSC Success Story: तुरुंगात असतानाही एमपीपीएससी परीक्षा देणाऱ्या जैनेद्र कुमार निगम यांनी १२ वी रँक मिळवत डीएसपी पदापर्यंत मजल मारली. कौटुंबिक वाद, तुरुंगवास आणि अनेक संकटांवर मात करत त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मोठे यश मिळवले.
Jainendra Kumar Nigam’s Inspiring Journey to DSP Success Through MPPSC
Jainendra Kumar Nigam’s Inspiring Journey to DSP Success Through MPPSCsaam tv
Published On: 

आयुष्यात कितीही संकटे आली, तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, हे मध्य प्रदेशातील जैनेद्र कुमार निगम यांनी दाखवून दिले आहे. काही वर्षांपूर्वी हातात बेड्या घालून पोलिसांच्या बंदोबस्तात परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या जैनेंद्र यांनी आता माध्य प्रदेशच्या लोकसेवा आयोगाच्या (MPPSC) परीक्षेत 12 वी रॅंक मिळवत पोलीस उपअधीक्षक (DSP) पदाला गवसणी घातली आहे. कौटुंबिक वाद, तुरुंगवास आणि गंभीर आजार अशा अनेक अडचणींवर मार करत त्यांनी हे यश मिळवले आहे.

Jainendra Kumar Nigam’s Inspiring Journey to DSP Success Through MPPSC
CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

भिंड जिल्ह्यातील डोंगरपुरा गावातील जैनेंद्र कुमार निगम हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे वडील केशव कुमार निगम यांनीही राज्य लोकंसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली होती. 1996 ते 2000 या काळात त्यांनी पाच वेळा MPPSC मुख्य परीक्षा दिली. मात्र कौटुंबिक परिस्थिती आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे त्यांचे DSP होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार जैनेंद्र यांनी केला. जैनेंद्र यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्यात यशही मिळवले. २०१५ मध्ये त्यांनी पोलीस आरक्षक भरती परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र, वडिलांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आणखी मोठ्या पदासाठी अभ्यास सुरू ठेवला. २०१७ मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षाही उत्तीर्ण केली. त्यानंतर २०१९ मध्ये शिक्षक भरती परीक्षेत यश मिळवले. मात्र, त्यांचे अंतिम लक्ष्य DSP होण्याचे असल्याने त्यांनी पुढील तयारी सुरू ठेवली.

Jainendra Kumar Nigam’s Inspiring Journey to DSP Success Through MPPSC
Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

कौटुंबिक वादामुळे तुरुंगवास; जेलमध्ये दिली MPPSC परीक्षा

२०१९-२० च्या काळात जैनेंद्र यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. कौटुंबिक वाद आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. या परिस्थितीतही त्यांनी अभ्यास सोडला नाही. विशेष म्हणजे, जैनेंद्र यांनी तुरुंगात असतानाच MPPSC ची परीक्षा दिली. परीक्षा केंद्रावर पोलिस त्यांना हातात बेड्या घालून घेऊन गेले होते. आयुष्यातील या कठीण काळातही त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न जिवंत ठेवले.

Jainendra Kumar Nigam’s Inspiring Journey to DSP Success Through MPPSC
Pune Crime News: पुणे हादरलं! गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

जानेवारी २०२१ मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जैनेंद्र यांनी इंदूर येथे जाऊन नव्याने अभ्यास सुरू केला. स्वतः नोट्स तयार करणे, नियमित सराव परीक्षा देणे आणि अभ्यासातील चुका सुधारण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या मेहनतीचे फळही मिळाले. MPPSC २०२० मध्ये त्यांची नायब तहसीलदार पदावर निवड झाली. त्यानंतर MPPSC २०२२ मध्ये त्यांची शालेय शिक्षण विभागात सहायक संचालक पदासाठीही निवड झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com