देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

ISRO Warning: इस्रोच्या अंदाजानुसार ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ दरम्यान उत्तर हिंद महासागरात तीन शक्तिशाली चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
ISRO cyclone warning
ISRO cyclone warningsaam tv
Published On

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांसाठी गंभीर इशारा दिला आहे, इस्रोच्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या कालावधीत उत्तर हिंद महासागर तब्बल तीन शक्तिशाली चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या संभाव्य चक्रीवादळाची तीव्रता इतर वर्षांच्या तुलनेत अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. इस्रोने आपल्या उपग्रह आणि हवामान निरीक्षण प्रणालीच्या माध्यमातून केलेल्या अभ्यासात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तीन शक्तिशाली चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली आहे. याबाबतची माहिती MOSDAC या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ISRO cyclone warning
Weather Alert: भारताचं टेन्शन वाढलं! देशावर येतंय १०० वर्षांतलं सर्वात मोठं संकट; हवामान तज्ज्ञांचा इशारा

या संभाव्य चक्रीवादलांबमुळे अतिवेगाने वारे वाहणे, मुसळधार पाऊस पडणे, तसेच समुद्रात उंच आणि धोकादायक लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जाणवू शकतो. त्याच बरोबर अरबी समुद्रालगतची गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि केरळ ही राज्येदेखील या धोकादायक हवामानाच्या तडाख्यात सापडू शकतात.

ISRO cyclone warning
Maharashtra Weather : सावधान! पुढील २४ तास मुसळधार; विदर्भासह 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा थेट 'येलो अलर्ट'

44 वर्षांच्या सरासरीपेक्षा 83 टक्के अधिक तीव्रता?

इस्रोच्या अंदाजानुसार, या चक्रीवादळांची ताकद दर्शवणारा पॉवर डिसिपेशन इंडेक्स (PDI) मागील 44 वर्षांच्या सरासरीपेक्षा तब्बल 83 टक्क्यांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. संभाव्य PDI 1.30 इतका असल्याचे सांगण्यात आले आहे. 1982 ते 2025 या कालावधीतील आकडेवारीच्या तुलनेत हा निर्देशांक अधिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ISRO cyclone warning
Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

PDI म्हणजे चक्रीवादळाची विनाशकारी क्षमता, त्याचा कालावधी आणि चक्रीवादळांची संख्या यांचा एकत्रित विचार करून त्यातून निर्माण होणाऱ्या एकूण ऊर्जेचा अंदाज देणारा वैज्ञानिक निर्देशांक.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com