

एल निनोमुळे जगाचं टेन्शन वाढलं
भारतावर देखील एल निनोमुळे संकट येणार
एल निनोमुळे भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता
एल निनोचा मान्सून आणि शेतीवर परिणाम होणार
भारतावर आता नवं संकट येणार आहे. एल निनोच्या अंदाजाने देशाचं टेन्शन वाढलं आहे. या एल निनोमुळे जागतिक हवामानात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वर्षीचा एल निनो १०० वर्षांतील सर्वात शक्तिशाली ठरू शकतो. ब्रिटनच्या हवामान विभागाने इशारा दिला की, २०२७ मधील एल निनोच्या प्रभावामुळे जग २०२४ मधील स्थितीवर जाऊ शकते. इतकेच नाही तर २०२४ मधील उष्णतेचा विक्रमही मोडला जाईल.
एल निनोमुळे मान्सूनवर आधीच परिणाम झाला आहे. यामुळे भारतातील दोन हंगामातील पिकांचे नुकसान होऊ शकते. शिवाय, तापमानही वाढेल. या हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण जगासह भारतातील शेती क्षेत्राला मोठा फटका बसेल. देशीतल खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम होईल. ब्रिटनच्या हवामान विभागाच्या अहवालानुसार, यावर्षी तापमान सामान्यपेक्षा ३ अंश सेल्सिअसपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. एका ब्रिटिश विभागाचा हवाला देत बीबीसीने वृत्त दिले आहे की, गेल्या १०० वर्षांत नागरिकांनी एल निनोचा जितका गंभीर परिणाम पाहिला नाही तितका गंभीर परिणामआपण यावर्षी आणि पुढील वर्षी पाहणार आहोत.
पॅसिफिक महासागराचे तापमान सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटन हवामान विभागाच्या अहवालानुसार, २०१५ च्या तुलनेत सध्या तापमान २.६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. नोव्हेंबरपर्यंत ते ३.९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. एल निनोबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही परंतु जर तो अंदाजानुसार गंभीर असेल तर जागतिक हवामानावर गंभीर परिणाम होईल आणि त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागेल.
२०२४ मध्ये तीव्र उष्णतेची लाट आली होती. ब्रिटनच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, जर एल निनोचा संभाव्य परिणाम प्रत्यक्षात आला तर २०२७ मधील उष्णतेची लाट सर्व विक्रम मोडण्याची शक्यता आहे. एल निनोचे परिणाम ९ महिने ते १ वर्ष टिकतात आणि त्याचा जगभरातील तापमानावर परिणाम होतो. हवामानशास्त्रज्ञ निक डन्स्टोन यांनी सांगितले की, जागतिक तापमान सध्या सामान्यपेक्षा १.५ अंशांनी जास्त आहे. दरम्यान, भारतात सध्या एल निनोचा परिणाम मान्सूनवर जाणवत आहे. यावर्षी संपूर्ण हंगामात सामान्य पावसाच्या फक्त ९० टक्के पावसाची अपेक्षा आहे. गेल्या ११ वर्षांतील हा सर्वात कमी पाऊस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.