

यवतमाळ जिल्ह्यात ४८ तासांत ८ जणांचा आकस्मिक मृत्यू.
प्राथमिक अंदाजानुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता.
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम.
संजय राठोड, साम प्रतिनिधी
विदर्भात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्यात उष्मघातामुळे गेल्या ४८ तासात ८ जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे, हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज आहे. या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
दिग्रस येथे चोवीस तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती, यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये दोन तर बाभुळगावच्या गवंडी येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये यातील चौघांची ओळख पटलीये चौघे अज्ञात आहेत. बाभुळगांवच्या गवंडी ते किन्ही रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला.
तर पुसदच्या हनुमान वॉर्डात अन्नपूर्णामुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कुलर मध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं,रूग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.पुसदच्याच नगरपरिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.जिल्ह्यात प्रचंड उष्ण लहरी वाहत असून,भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत तीव्र उष्ण लाटेची शक्यता असल्याने रेड अलर्ट कायम आहे. यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातून ८ जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.