Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

IMD heavy rain alert for 22 states in India : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

weather forecast for 22 states heavy rainfall : देशातील २२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा मोठा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं अनेक भागांत जोरदार वारा वाहण्याची शक्यता वर्तवलीय. या खराब हवामानामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनानं लोकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलंय. हवामानातील बदलांमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची दाट शक्यताय.

बंगालचा उपसागर आणि परिसरात नव्याने कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे ९ ते ११ सप्टेंबर म्हणजेच तीन दिवस ओडिशात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर १० ते १३ सप्टेंबर या कालावधीत छत्तीसगड, १०-११ सप्टेंबरला आंध्र प्रदेशचा किनारी भाग, १०-१३ सप्टेंबरला तेलंगणा आणि ११ आणि १२ सप्टेंबरला मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

उत्तर भारतात ९-१५ सप्टेंबरमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख, ९-१३ सप्टेंबर या काळात हिमाचल प्रदेशात, ९ ते १० आणि १५ सप्टेंबरला उत्तराखंडमध्ये काही भागांत पावसाची शक्यता आहे. ९ -१५ सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश, हरयाणा, चंदीगड, पंजाब, ११ ते १५ सप्टेंबर उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, १२ ते १५ सप्टेंबरच्या काळात राजस्थानचा पश्चिमेकडील भाग, ९ आणि ११ ते १५ सप्टेंबर पूर्व राजस्थानमध्ये काही प्रमाणात पाऊस कोसळेल. १४ ते १५ सप्टेंबर या दोन दिवसांत उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडेल. ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत विदर्भात वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. १२ ते १४ सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशचा पश्चिमेकडील भाग, ११ सप्टेंबरला मध्य प्रदेशचा पूर्व भाग, १२-१३ सप्टेंबरला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com