Israel Elections: इस्रायल निवडणुकीत मोठा ट्विस्ट; पंतप्रधान नेतन्याहूंसमोर 'बहुमत' संकट; सत्तापालट होणार?

Israel Political Crisis: इस्रायल संसदीय निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. बहुमत न मिळाल्याने नेतन्याहूंसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.
Israel Elections: इस्रायल निवडणुकीत मोठा ट्विस्ट; पंतप्रधान नेतन्याहूंसमोर 'बहुमत' संकट; सत्तापालट होणार?
Israel Political Crisis:Saam Tv
Published On: 
  • इस्रायलच्या २०२६ च्या संसदीय निवडणुकीचा निकाल जाहीर

  • कोणत्याही प्रमुख गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही

  • नेतन्याहू यांच्या गटाला ५३ जागा मिळाल्या, तर विरोधी गटाला ४८ जागा मिळाल्या

  • अरब नेतृत्वाखालील पक्षांनी एकत्रित १९ जागा जिंकल्या

इस्रायलमध्ये सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इस्रायलमध्ये पार पडलेल्या संसदीय निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या गटाला संसदेत बहुमत मिळाले नाही. त्यामुळे इस्त्रायलच्या पुढील सरकारमध्ये अरब पक्ष किंगमेकर ठरणार आहेत. कारण त्यांच्या एकत्रित १९ जागांमुळे विरोधी पक्षाला सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण विरोधी पक्षात असलेले मतभेद आणि अरब गटांसोबतच्या सहकार्याबाबतची अनिश्चितता इस्रायलमध्ये सरकार स्थानप करण्याच्या प्रयत्नात अडथळा निर्माण करू शकतात.

इस्रायलमधील निवडणुकांनंतर सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता कायम आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या गटाला बहुमत मिळवता आले नाही. निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा संस्था शिन बेट यांनी निवडणूक घोटाळा आणि परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. इस्रायलच्या संसदेत एकूण १२० जागा आहेत. नेतन्याहू यांच्या लिकुड गटाने ५३ जागा जिंकल्या. तर विरोधी गटाने ४८ जागा जिंकल्या आहेत. केंद्रीय निवडणूक समितीने शुक्रवारी पहाटे जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार, उर्वरित १९ जागा अरब-नेतृत्वाखालील पक्षांनी जिंकल्या आहेत. सर्व पक्षांना बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ६१ जागांपैकी कमी जागा मिळाल्या आहेत.

Israel Elections: इस्रायल निवडणुकीत मोठा ट्विस्ट; पंतप्रधान नेतन्याहूंसमोर 'बहुमत' संकट; सत्तापालट होणार?
MLC Election Result: विधान परिषदेच्या ५ जागांचा अंतिम निकाल जाहीर, मविआ ३ तर महायुतीला २ जागांवर यश; कुठे कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा विजय?

नेतन्याहू यांचा 'लिकुड' पक्ष २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. आघाडी किंवा विरोधी गट यांपैकी कोणालाही संसदीय बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ६१ जागा मिळवता आल्या नाहीत त्यामुळे सत्तेचे संतुलन अनिश्चित झाले आहे. नेतान्याहू यांनी मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अरब पक्षांनी हेराफेरी केली. त्यांनी पोलिस, शिन बेट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तपास करण्याची मागणी केली.

Israel Elections: इस्रायल निवडणुकीत मोठा ट्विस्ट; पंतप्रधान नेतन्याहूंसमोर 'बहुमत' संकट; सत्तापालट होणार?
ZP Election: झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 'या' जिल्हा परिषदांमध्ये होणार निवडणूक; वाचा लिस्ट

नेतन्याहू यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पुढील सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत २ अरब राजकीय गटांचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत. इस्रायलमध्ये सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेल्या नेतन्याहू हे पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीकडे त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची कसोटी मानली जात आहे. २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर १२० सदस्यांच्या संसदेत नेतन्याहू यांच्याकडे ६४ जागांचे बहुमत आहे.

दरमयान, इस्रायलमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. इस्रायलचे राष्ट्रपती हर्जोग सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करतील आणि त्यानंतर ते एका राजकीय पक्षाच्या नेत्याला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण देतील. या प्रक्रियेसाठी आता आठवड्याचा कालावधी लागू शकतो. जर हे करण्यात ते अयशस्वी झाले तर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

Israel Elections: इस्रायल निवडणुकीत मोठा ट्विस्ट; पंतप्रधान नेतन्याहूंसमोर 'बहुमत' संकट; सत्तापालट होणार?
MLC Election Result: २८ जागांचा निकाल जाहीर! कुणाची बाजी अन् कुणाला धक्का? पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.