

महाराष्ट्रातील प्रलंबित २० जिल्हा परिषद निवडणुकां होणार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर झेडपी निवडणुका होणार आहेत
ओबीसी आरक्षणामुळे जिल्हा परिषद निवडणुका रखडल्या होत्या
राज्यातील प्रलंबित झेडपी निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटलेला नाहीये. त्यामुळे आगामी निवडणुकांत ओबीसींच्या जागा घटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं? OBC मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कसं लक्ष्य केलंय? पाहूयात या रिपोर्टमधून...
राज्यातील OBC आरक्षणामुळे रखडलेल्या निवडणुकांचं लवकरच बिगुल वाजणार आहे. सुमारे 22 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय. जुन्याच आदेशांनुसार निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं सरकारला दिलेत. OBC आरक्षणासंदर्भात याचिकेवर सुनावणी वेळी कोर्टानं महत्त्वपूर्ण आदेश दिलेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे राज्यातील कोणत्या झेडपी निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय? पाहूयात...
पालघर
ठाणे
नाशिक
धुळे
नंदुरबार
जळगाव
अहिल्यानगर
बीड
जालना
नांदेड
हिंगोली
अमरावती
अकोला
वाशिम
बुलढाणा
यवतमाळ
नागपूर
वर्धा
गडचिरोली
चंद्रपूर
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर टीका केलीये. सरकार ओबीसी विरोधी असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे, OBC आरक्षणानं 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानं या निवडणुकांना मे 2025 मध्ये स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टानं स्थगिती उठवलीये. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या निवडणुकांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार? प्रलंबित निवडणुकांच्या तारखा कधीपर्यंत जाहीर होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.